शेतीची वाटणीसाठी मोठा भाऊ करत होता टाळाटाळ, व्हिडीओ बनवत तरुणाने केली आत्महत्या

मुखेड : मोठा भाऊ शेती व मालमत्तेत वाटणी देण्यास टाळाटाळ करीत होता. त्यामुळे लहान भावाने व्हाट्सअप वर आत्महत्या करीत असल्याची चित्रफीत टाकून शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. (Youth suicide) ही धक्कादायक घटना मुखेड तालुक्यातील हिब्बट येथे गुरुवारी सकाळी दहा वाजता घडली. (The elder brother was reluctant to share the farm. The young man committed suicide by making a video)

 

 

 

तालुक्यातील हीब्बट येथील रमाकांत हनुमंत कांगणे यांना तीन भाऊ आहेत. यातील मोठा भाऊ गोविंद याच्यासमवेत रमाकांत हे उद्योग व्यवसाय करत व्यवसायातून घेतलेली शेती, घरे गोविंद यांनी नावावर करून घेतली. त्यामुळे लहान भाऊ रमाकांत याने शेती व घराची माझा मला वाटणी दे अशी मागणी करत होता. मात्र, मोठा भाऊ वाटणी देत नसल्याने रमाकांत कांगणे (वय ४०) याने मी आत्महत्या करीत असून, (Youth suicide) यास मोठा भाऊ गोविंद व त्याची पत्नी हे जबाबदार आहेत. मित्रानो, माफ करा असे म्हणून मोबाईल वर व्हिडिओ करून व्हाट्सअपवर व्हायरल करून शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपली.

 

 

दरम्यान, रमाकांत यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन लहान मुलं भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला असून, शवविच्छेदनासाठी रमाकांत यांचे मृतदेह मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे. (The elder brother was reluctant to share the farm. The young man committed suicide by making a video)

Local ad 1