...

स्टार्टअप्सना बळकटी देण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबवा – रोहन सुरवसे-पाटील

पुणे :  महाराष्ट्र शासनाने 2026-27 च्या अर्थसंकल्पात स्टार्टअप क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘नवीन स्टार्टअप व नाविन्यता धोरण 2026’ जाहीर केले असून, पुढील पाच वर्षांत तब्बल स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या महत्त्वाकांक्षी धोरणाचा लाभ राज्यातील नवउद्योजकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, यासाठी व्यापक जनजागृती व मार्गदर्शन मोहीम राबविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना निवेदन सादर केले असून, पुणे शहर आणि जिल्ह्यातील उद्योजकांसाठी विशेष उपक्रम राबविण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे. या मागणीची दखल घेत लवकरच जनजागृती मोहीम राबविण्यात येईल, असे आश्वासन नाईक यांनी दिले आहे. (startup policy 2026 pune awareness campaign)

 

 

वाहन बाजारावर मंदीचे सावट ; गुढीपाडव्याला पुण्यात खरेदीत घसरण !

 

पुणे जिल्हा – उद्योजकतेचे वाढते केंद्र

पुणे जिल्हा औद्योगिक, शैक्षणिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने विकसित होत आहे. येथे मोठ्या प्रमाणावर युवक-युवती, महिला तसेच ग्रामीण भागातील नागरिक स्वयंरोजगार आणि उद्योग क्षेत्राकडे वळत आहेत. मात्र, शासनाच्या विविध योजनांची माहिती वेळेवर व प्रभावीपणे न मिळाल्यामुळे अनेक इच्छुक उद्योजक या संधींपासून वंचित राहत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

योजनांची माहिती पोहोचवण्यावर भर
जिल्हा उद्योग केंद्र (DIC) मार्फत खालील योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची मागणी करण्यात आली आहे. पीएमईजीपी (PMEGP) योजना, मुद्रा योजना, महिला उद्योजकता योजना, स्टार्टअप इंडिया तसेच, उद्योग सुरू करताना लागणारे अनुदान, बँक कर्ज, तांत्रिक सहाय्य आणि परवानगी प्रक्रिया याबाबत एकाच ठिकाणी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा
या उपक्रमांमुळे पुणे जिल्ह्यातील युवक-युवती, महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. परिणामी, स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Local ad 1