पुणे : संजय रविकांत मयेकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी नुकतीच जाहीर झाली आहे. मयेकर यांनी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागातून ‘पुणे महानगरपालिका शिक्षण विभागातील योजनांचा अभ्यास’ या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला होता. या संशोधनामध्ये पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या विविध योजनांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.
त्यांच्या संशोधन कार्याला पुणे विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागाच्या डॉ. गायत्री चौकडे यांचे मार्गदर्शन लाभले.
संजय मयेकर यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. शिक्षण क्षेत्रातील धोरणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शैक्षणिक योजनांवर आधारित त्यांचा अभ्यास भविष्यात संशोधक आणि प्रशासनासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

