राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस, विदर्भात शंभर तर मराठवाड्यात 93 टक्केच पाऊस  

पुणे : राज्यात यंदा सरासरीच्या 95 टक्के पाऊस होण्याची शक्यता असून, विदर्भात 100 टक्के होईल. मराठवाड्यात यंदा 93 पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा, असे आवाहन कृषी हवामान तज्ज्ञ व कृषी हवामान फोरम साउथ आशियाचे संस्थापक सदस्य डॉ. रामचंद्र साबळे यांनी केले. (Rainfall is less than average in the state this year, 100 per cent in Vidarbha and 93 per cent in Marathwada)

 

 

डॉ. रामचंद्र साबळे हे गेल्या 21 वर्षांपासून पावसाचा अंदाज व्यक्त करत आहेत. यंदा पाऊस कसा असेल याविषयी पत्रकार परिषद घेत डॉ. साबळे यांनी माहिती दिली. डॉ. साबळे म्हणाले, राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीचा दीर्घकालीन पावसाचा अंदाज जाहीर करताना डॉ.साबळे म्हणाले, हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वार्‍याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे. कोकणात 94 टक्के पाऊस होईल, असा अंदाज आहे. त्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रात 93.5 टक्के पाऊस होण्याची शक्यता असून, ते सरारीपेक्षा कमी आहे, असा अंदाज व्यक्त केला आहे.

 

 

 पावसात मोठा खंड असेल

या वर्षी वार्‍याचा वेग कमी आढळल्याने जून-जुलै महिन्यात खंड राहण्याची शक्यता असून, धुळे जळगाव, राहुरी, कराड, अकोला, पाडेगाव, शिंदेवाही येथे पावसात मोठे खंड राहण्याची शक्यता आहे. तर दापोली, पुणे, कोल्हापूर, नागपूर, यवतमाळ, निफाड, सोलापूर, व परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे. तसेच आँगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील. कमी तर कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड हवामानात राहतील.

 

 

धूळवाफ पेरणीही करू नका

यंदाच्या पावसाळ्यात राज्यात 95 टक्के पावसाचा अंदाज असून, यामध्ये पूर्व विदर्भ व मध्य विदर्भ विभागात शंभर टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित अनेक भागात पावसाचा खंड पडेल. जून महिन्यात कमी पाऊस आहे. त्यामुळे खरिपात शेतकर्‍यांनी 65 मिलिमीटर पाऊस व पुरेसा ओलावा झाल्याशिवाय पेरणी करू नये. यशिवाय धुळवाफ पेरणी करू नये.  (Rainfall is less than average in the state this year, 100 per cent in Vidarbha and 93 per cent in Marathwada)

 

Local ad 1