Record rainfall। नांदेड जिल्ह्यात यंदा विक्रमी पाऊस ; किती झाला जाणून घ्या..!

Record rainfall । नांदेड : कधी उघडीत तर कधी अतिवृष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून, नगदी पिके पुर्णपणे वाय गेली आहेत. तर दुसरीकडे गेल्या पंधरा वर्षांतील विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. (Record rainfall in Nanded district this year)

 

हवामान विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात २००५ मध्ये १३२ टक्के पाऊस झाला होता. यानंतर २०२१ मध्ये आतापर्यंत १३२.५७ टक्के अशा विक्रमी पावसाची नोंद झाली.

 

Cabinet decision । मंत्री मंडळाने ‘हे’ घेतले महत्वाचे निर्णय

 पंधरा वर्षांनी २०२१ मध्ये पावसाचे प्रमाण त्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात आहे. २००५ मधील विक्रम तोडून ११८१.६० मिलिमीटरनुसार १३२.५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

(Record rainfall in Nanded district this year)

 

 

मराठवाड्यात सर्वाधीक सरासरी ९५५.५५ मिलिमीटर पाऊस नांदेड जिल्ह्यात होतो. यातही जंगलव्याप्त भाग असलेल्या किनवट तसेच माहूर तालुक्याची सरासरी १२५० मिलिमीटर आहे. २००३ पासून जिल्ह्यात कमी अधिक पावसाची नोंद होत असून, यात सहा वेळा पावसाने सरासरीच्या अधिक पाऊस जिल्ह्यात झाला आहे.

 

नांदडे जिल्ह्यात २०१४ व २०१५ मध्ये अनुक्रमे ४५ व ४८ टक्के पाऊस झाल्याने कोरड्या दुष्काळाचा सामनाही करावा लागला. (Record rainfall in Nanded district this year)

 

 

 

Local ad 1