...

बाप्पु मानकर यांचा प्रभाग २५ मध्ये घरोघरी संपर्क दौरा ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Pune Municipal Election 2026 पुणे, पुणे महापालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ (शनिवार पेठ–महात्मा फुले मंडई) येथील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी प्रभागातील विविध भागांमध्ये घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला. या संपर्क दौऱ्यादरम्यान अनेक ठिकाणी नागरिकांनी औक्षण करून मानकर यांचे स्वागत करत त्यांना आशीर्वाद दिले.

 

पुण्याच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व हरपले । Suresh Kalmadi Passed Away

 

हा संवाद दौरा शनिवार पेठेतील आपटे घाट, महालिरकर टेकडी, उभा शनिवार, तांबे बोळ, घोडके आळी, वीर मारुती चौक, कडबे आळी, हसबनीस बखळ, काळभे वस्ती, मेहुनपुरा तसेच शनिवार पेठेतील इतर भागांमध्ये पार पडला. यावेळी नागरिकांनी ‘२४ तास जनसेवा कार्यालय’ आणि ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ अंतर्गत झालेल्या कामांचे कौतुक करत, भविष्यातही अधिक विकासकामांची अपेक्षा व्यक्त केली.

 

या प्रचार दौऱ्यात कसबा मतदारसंघ सरचिटणीस निलेश कदम, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, धनंजय डेंबळे, उमेश नवरे, अनंत कुंटे, राम दहाड, भूषण बोकील, अतुल मुरकुटे, अमित मुनोत, सर्वेश पवार, मनीष जाधव, ओंकार डिंबळे, कौस्तुभ गोखले, महेश काटदरे, यश थोपटे, कौस्तुभ गाडे आणि संतोष नामजोशी** यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, अनेक मतदारांनी भारतीय जनता पक्षालाच विजयी करण्याचे आश्वासन दिले.

 

 

 

 

Local ad 1