(Pune news) चौघींसोबत थाटला संसार, तब्बल 53 जणींना जाळ्यात ओढणारा दादला गजाआड

पुणे | शिक्षण बारावी नापास, रुबाब मात्र, सैन्य दलातील एखाद्या अधिकार्‍यासारखा. त्या जोरावरच त्याने चौघींसोबत वेगळे संसार थाटले. तर  53 तरुणींना जाळ्यात ओढणाऱ्या दादल्याला पोलिसांनी  (Pune news)  बेड्या ठेकल्या आहेत.  

 

योगेश दत्तु गायकवाड (वय.27,रा. डोंगरगाव,ता.कन्नड) असे अटक केलेल्या आरोपिचे नाव आहे. तर त्याचा दुसरा साथीदार संजय ज्ञानबा शिंदे (रा. केडगाव, जि. अहमदनगर) याला देखील अटक करण्यात आली आहे. योगेशने पुण्यातील एका तरुणीला जाळ्यात खेचून त्याने लग्न केले. त्यानंतर तिला व तिच्या घरच्यांना विश्वासात घेऊन नात्यातील आणि गावातील तरुणांना सैन्य दलात नोकरी लावण्याच्या आमिषाने 50 लाखाचा गंडा घातला. त्यानंतर तो कर्तव्यावर जात असल्याचे सांगून निघून गेला होता. गायकवाडने आतापर्यंत 40 पेक्षा अधिक तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून 50 लाखापेक्षा अधिक  रूपयांची फसवणूक केली आहे.  यावेळी त्यांच्याकडून सैन्य दलातील जवानांची वर्दी, एक चारचाकी गाडी, दोन दुचाकी असा 5 लाख 41 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.(Pune news)

एका तरुणीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्र्‍याद दिली आहे. जानेवारी 2020 मध्ये आईच्या उपचारासाठी बिबवेवाडीतील एका हॉस्पिटलमध्ये आली होती. त्यावेळी पीएमपी बस स्थानकावर बसची वाट पाहत असताना आरोपी योगेशचे आधारकार्ड तरुणीला सापडले. त्यावेळी तिने आवाज देत योगेशला आधार कार्ड दिले. त्यानंतर त्याने फिर्यादी तरुणी आणि तिच्या आईसोबत ओळख वाढविली. लष्करामध्ये असल्याचे खोटे ओळखपत्र दाखवून तरुणीच्या आईचा विश्वास संपादित केला. त्यानंतर तरुणीसोबत खोटे लग्न करून तिच्या भावाला लष्करात भरती करण्यासाठी दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर तरुणीच्या गावातील तरुणांचा विश्वास संपादित करून योगेशने आतापर्यंत 53 लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.  (Pune news)

उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ निरीक्षक सुनील झावरे, यांच्या सुचनेनुसार  पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर, सहायक निरीक्षक राजेश उसगावकर कर्मचारी तात्या देवकते, अमित पुजारी, सतीश मोरे, दिपक लोधा, तानाजी सागर यांच्या पथकाने ही कारवाई केली. (Pune news)

 

Local ad 1