...

“अविश्वसनीय ! पुण्यात ९५ दिवसांत उभी १४ मजली इमारत; पीएमआरडीएचा जागतिक विक्रम”

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) गृहनिर्माण आणि अभियांत्रिकी क्षेत्रात जागतिक स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा नवा झेंडा फडकावला आहे. चिखली येथील सेक्टर १२ गृहनिर्माण प्रकल्पात अवघ्या ९५ दिवसांत १४ मजली इमारत उभी करण्याचा भीमकाय पराक्रम पीएमआरडीएने केला आहे. या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेत आशिया बुक आॅफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड्समध्ये या विक्रमाची सुवर्णाक्षरांनी नोंद करण्यात आली आहे. (pmrda 95 days 14 storey building record pune)

 

आता ‘डिप्युटेशन राज’ संपणार? महसूल विभागाचे नवे नियम लागू

 

 

विशेष म्हणजे, पीएमआरडीएने यापूर्वीचा आपलाच १०० दिवसांचा जुना विक्रम मोडीत काढत बांधकामाचा नवा मापदंड प्रस्थापित केला. मंगळवारी (दि. १४) चिखली येथील प्रकल्पस्थळी आयोजित दिमाखदार सोहळ्यात आशिया बुक आॅफ रेकॉर्ड्सचे परीक्षक अशोक अदाक यांनी अधिकृत प्रमाणपत्र व पदक देऊन पीएमआरडीएचा गौरव केला. प्राधिकरणाच्यावतीने मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी हा बहुमान स्वीकारला.

 

पुणे ZP कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक; सभापतींना व्यासपीठावर स्थान नाही

 

 

पीएमआरडीएचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली हा मैलाचा दगड गाठण्यात आला. हे अशक्यप्राय काम पूर्ण करण्यासाठी बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी या कंपनीच्या सुमारे ९ हजार कामगारांनी तीन शिफ्टमध्ये अहोरात्र काम केले. अत्याधुनिक प्रीकास्ट आरसीसी तंत्रज्ञानामुळे गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता ही इमारत विक्रमी वेळेत पूर्ण झाली. ही वास्तू पूर्णपणे भूकंपप्रतिरोधक असून शाश्वत नागरी विकासाचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

 

यापूर्वी मार्च २०२६ मध्ये पीएमआरडीएने १०० दिवसांत इमारत बांधून विक्रम केला होता. मात्र, अवघ्या एका महिन्यात पुन्हा स्वत:चेच रेकॉर्ड सुधारत ९५ दिवसांचे नवे लक्ष्य गाठले आहे. यापूर्वी बांधकाम क्षेत्रातील दिग्गज एल अँड टी कंपनीच्या नावावर ९६ दिवसांत १२ मजली इमारत बांधल्याची नोंद होती; त्यावर आता पीएमआरडीएने मात केली आहे.

दृष्टिक्षेपात विक्रमी बांधकाम :
– इमारत : १४ मजली निवासी इमारत (डी-३) एलआयजी
– एकूण क्षेत्रफळ : ९४,७२२ चौरस फूट
– सदनिका : ११२ (२ बीएचके)
– कालावधी : केवळ ९५ दिवस
– तंत्रज्ञान : प्रीकास्ट आरसीसी (इंडस्ट्रियलाइज्ड ३-एस सिस्टिम)

पीएमआरडीएच्या सेक्टर-१२ येथील गृहनिर्माण प्रकल्पात आम्ही मिशन ९५ डेज हे मोठे आव्हान स्वीकारले होते. अभियांत्रिकी कौशल्य आणि अचूक नियोजनाच्या जोरावर १४ मजली डी-३ एलआयजी इमारत केवळ ९५ दिवसांत पूर्ण करून आम्ही हा टप्पा गाठला आहे. ही यशस्वी अंमलबजावणी प्रामुख्याने ३-एस प्रीफॅब टेक्नॉलॉजी, झिरो लॅग शेड्युलिंग आणि अहोरात्र चालणाºया थ्री-शिफ्ट वर्किंग मॉडेलवर आधारित आहे. या प्रकल्पात फॅक्टरी-मेड प्रीकास्ट घटकांचा वापर केल्यामुळे बांधकामाचा वेग वाढला, तसेच गुणवत्तेतही कमालीची समानता राखली गेली आणि साहित्याची नासाडी कमी झाली.
– रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए

Local ad 1