NEET पुनर्परीक्षेनंतर परदेशातील वैद्यकीय शिक्षणाकडे कल !
NEET 2026 नंतर परदेशी MBBS ला पसंती; फिलिपाइन्स ठरतोय पर्याय
पुणे, ६ ऑगस्ट : नीट-यूजी (NEET-UG) २०२६ पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर भारतातील वैद्यकीय शिक्षणातील मर्यादित जागांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. देशातील एमबीबीएसच्या जागांच्या तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने अनेक विद्यार्थी आता एक वर्ष वाया घालवण्याऐवजी परदेशातील मान्यताप्राप्त वैद्यकीय शिक्षणाचा पर्याय स्वीकारत आहेत. मात्र, या प्रक्रियेत कोणत्या देशात शिक्षण घ्यायचे यापेक्षा कोणत्या संस्थेत शिक्षण घ्यायचे, याला अधिक महत्त्व प्राप्त होत असल्याचे निरीक्षण पुढे आले आहे.
२०२५ मध्ये नीट-यूजीसाठी सुमारे २३ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी जवळपास २२ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली; मात्र देशभरात केवळ सुमारे १.२३ लाख एमबीबीएस जागा उपलब्ध होत्या. परिणामी, पात्र ठरूनही मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना भारतात प्रवेश मिळू शकला नाही.
यामुळे परदेशातील वैद्यकीय शिक्षणाचा पर्याय स्वीकारणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (NMC) नियमांनुसार परदेशातील वैद्यकीय पदवीधारकांना भारतात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक निकष पूर्ण करावे लागतात. सध्या लागू असलेली Foreign Medical Graduate Examination (FMGE) आणि भविष्यात लागू होणारी National Exit Test (NExT) या दोन्ही परीक्षा विद्यार्थ्यांचे समान निकषांवर मूल्यमापन करणार असल्याने संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता, क्लिनिकल प्रशिक्षण आणि नियामक नियमांचे पालन हे घटक निर्णायक ठरत आहेत.
फिलिपाइन्सकडे वाढता कल
भारतीय विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाच्या प्रमुख परदेशी केंद्रांमध्ये फिलिपाइन्सचा समावेश होत आहे. दरवर्षी सुमारे दोन ते तीन हजार भारतीय विद्यार्थी तेथे वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतात. इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रम, अमेरिकन पद्धतीवर आधारित एमडी शिक्षण, सुरुवातीपासून मिळणारे क्लिनिकल प्रशिक्षण आणि भारतीय विद्यार्थ्यांना अनुकूल वातावरण यामुळे हा देश लोकप्रिय ठरत असल्याचे सांगितले जाते.
फिलिपाइन्समधील वैद्यकीय शिक्षणात प्री-मेडिकल पदवी, त्यानंतर डॉक्टर ऑफ मेडिसिन (एमडी) अभ्यासक्रम आणि १२ महिन्यांची इंटर्नशिप असा टप्प्याटप्प्याने अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. २०२४ मधील कायद्यातील सुधारणांनंतर पात्र परदेशी विद्यार्थ्यांनाही तेथे वैद्यकीय नोंदणी करून व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
NMC निकषांचे पालन महत्त्वाचे
फिलिपाइन्समधील Commission on Higher Education (CHED) मान्यताप्राप्त संस्थांमधील एमडी अभ्यासक्रम हा भारताच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (NMC) परदेशी वैद्यकीय पदवीधारकांसाठीच्या निकषांशी सुसंगत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यात ५४ महिन्यांचा अभ्यासक्रम, इंग्रजी माध्यम, निर्धारित विषयांचा समावेश आणि १२ महिन्यांची इंटर्नशिप या अटींचा समावेश आहे. मार्च २०२६ मध्ये फिलिपाइन्सच्या प्रतिनिधीगृहानेही यासंदर्भातील ठराव मंजूर केला असून, मनिला येथील भारतीय दूतावासानेही याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
संस्थेची गुणवत्ता ठरते निर्णायक
फिलिपाइन्समधील Davao Medical School Foundation (DMSF) या संस्थेने एफएमजीई जून २०२६ परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात सुमारे ७५ टक्के उत्तीर्णतेचा दावा केला आहे. या संस्थेच्या तीन विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गुणवत्ता यादीत (AIR) पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले असून, देशातील अव्वल १३० यशस्वी उमेदवारांपैकी ४० विद्यार्थी या संस्थेचे असल्याचे सांगण्यात आले आहे. याचप्रमाणे University of the Visayas Gullas College of Medicine ही संस्थाही एनएमसी आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) निकषांनुसार मान्यताप्राप्त असून क्लिनिकल प्रशिक्षणावर विशेष भर देते.
“भारतीय विद्यार्थ्यांसाठी परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय आता केवळ देश निवडण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. शैक्षणिक गुणवत्ता, प्रत्यक्ष क्लिनिकल प्रशिक्षण, नियामक मान्यता आणि परवाना परीक्षांमधील कामगिरी यावर पालक आणि विद्यार्थी अधिक भर देत आहेत.” परदेशात वैद्यकीय शिक्षणाचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित संस्था CHED मान्यताप्राप्त असून ती NMC च्या सर्व निकषांचे पालन करते, याची खातरजमा करणे आवश्यक आहे. – कॅडविन पिल्लई, व्यवस्थापकीय संचालक, ट्रान्सवर्ल्ड एज्युकेअर.

