...

नांदेडकरांनो घाबरू नका! पेट्रोल साठा पुरेसा आहे; जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले पंप बंद होण्याचे खरे कारण

 

नांदेड : गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, या निव्वळ अफवा असून जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, असे स्पष्टीकरण नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहे. नागरिकांनी ‘पॅनिक पर्चेस‘ (भीतीपोटी अतिखरेदी) टाळावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. (nanded collector rahul kardile clarifies no petrol diesel shortage rumors)

 

pune municipal budget 2026-27 : विकासाचे दावे मोठे, पण वास्तव काय? पुणे मनपाचा 15 हजार कोटींचा बजेट चर्चेत

 

जिल्हाधिकाऱ्यांनी पंप बंद होण्यामागचे तांत्रिक कारण स्पष्ट केले आहे. सर्वसामान्यपणे नागरिक मर्यादित इंधन भरतात, मात्र अफवांमुळे अनेक जण गाड्यांच्या टाक्या ‘फुल’ करून घेत आहेत. या अनावश्यक गर्दीमुळे पंपावरील उपलब्ध साठा टँकर येण्यापूर्वीच संपत आहे. पंपावरील कर्मचाऱ्यांच्या कामाला मर्यादा असून, गर्दी हाताळणे कठीण होत असल्याने काही ठिकाणी तात्पुरते पंप बंद ठेवावे लागत आहेत.

 

पुणे महापालिका बजेट २०२६ : आरोग्य तपासणी निधीत भेदभाव, अरविंद शिंदेंचा भाजपवर आरोप

 

इंधन कंपन्यांनी पुरवठ्याच्या नियमांत बदल केला आहे. पूर्वी टँकर आल्यानंतर ४ दिवसांनी पेमेंट करण्याची सोय होती, मात्र आता ‘अ‍ॅडव्हान्स पेमेंट सिस्टिम’ (आगाऊ रक्कम) लागू झाली आहे. पेमेंट केल्यानंतरच टँकर भरला जात असल्याने पुरवठा साखळीत थोडा वेळ लागत आहे. मात्र, याचा अर्थ इंधनाचा तुटवडा आहे असा होत नाही.

 

 

“नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी कमी केली आणि गरजेपुरतेच इंधन खरेदी केले तर कोणालाही अडचण येणार नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला सहकार्य करा,” असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

 

 

 

 

 

 

Local ad 1