...

व्हिडओ : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील ‘कनेक्टिंग लिंक’चे उद्घाटन

 

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ अर्थात नव्या मार्गिकेचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाला ‘मिसिंग लिंक’ऐवजी कनेक्टिंग लिंक म्हणण्याचे आवाहन केले. या उद्घाटन सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि वाहनचालक उपस्थित राहिल्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे लोकार्पण कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू झाला. (Mumbai Pune Expressway Missing Link Inauguration)

 

 

Maharashtra HSC Result 2026 : १२ वीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ; निकालाची तारीख जाहीर

 

 

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील कुसगाव ते खोपोली दरम्यानचा १३.३ किमी लांबीचा हा नवा मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) उभारला आहे. या मार्गामुळे मुंबई ते पुणे प्रवासाचा कालावधी सुमारे २५ ते ३० मिनिटांनी कमी होणार असून अंतरही सुमारे ६ किमीने घटणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे केवळ वेळेची बचत होणार नाही, तर दररोज कोट्यवधी रुपयांच्या इंधनाचीही बचत होईल. “हा प्रकल्प महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांमधील महत्त्वाचा टप्पा आहे,” असे ते म्हणाले.

 

१८२ मीटर उंच केबलस्टेड पूल ठरला आकर्षण

या प्रकल्पातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे १८२ मीटर उंचीचा केबलस्टेड पूल. हा पूल जगातील सर्वाधिक उंच केबलस्टेड पुलांपैकी एक असल्याचा दावा करण्यात आला आहे. नदीवर उभारण्यात आलेला हा पूल अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना मानला जात आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, या परिसरात प्रचंड वेगाने वारे वाहतात. त्यामुळे पूल उभारताना विशेष तांत्रिक उपाययोजना करण्यात आल्या. हा पूल ताशी २४० किमी वेगाच्या वाऱ्यालाही तोंड देऊ शकतो, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील खोपोली-कुसगाव दरम्यानचा हा मार्ग आता ६ ऐवजी ८ पदरी झाला आहे. या प्रकल्पात दोन भव्य बोगद्यांचाही समावेश आहे . २१.४२ मीटर रुंदीचा हा बोगदा देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा असल्याचा दावा आहे. तसेच ८.९२ किमीचा बोगदा हा आशियातील सर्वाधिक रुंद आणि डोंगराखालून तसेच तलावाखालून जाणारा बोगदा आहे. विशेष म्हणजे हा बोगदा **लोणावळा तलावाच्या तळाखालून ५०० ते ६०० फूट खोल जातो. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

 

 

 

 

 

Local ad 1