...

Global Guruji Yojana। आता गुरुजीही होणार ग्लोबल ! पुणे जिल्हा परिषदेची भन्नाट योजना !

Global Guruji Yojana। पुणे : जिल्ह्यातील शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेकडून ‘ग्लोबल गुरुजी’ ही महत्त्वाकांक्षी योजना पुढील आर्थिक वर्षात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ५० उत्कृष्ट शिक्षकांची निवड करून त्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षण पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी परदेशात पाठविण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे शिक्षकांना जागतिक स्तरावर वापरल्या जाणाऱ्या आधुनिक अध्यापन तंत्रांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. (global guruji yojana pune teachers foreign training)

 

वाहन बाजारावर मंदीचे सावट ; गुढीपाडव्याला पुण्यात खरेदीत घसरण !

 

विद्यार्थी-केंद्रित शिक्षण प्रणाली, डिजिटल साधनांचा वापर, कौशल्याधारित शिक्षण आणि प्रभावी शाळा व्यवस्थापन या बाबींचा सखोल अभ्यास या दौऱ्यात करता येणार आहे.विशेष म्हणजे, उच्च दर्जाच्या सार्वजनिक शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या Finland आणि Singapore या देशांतील शिक्षण पद्धतींचा अभ्यास शिक्षकांना करता येणार आहे.

 

‘टीचर इनोव्हेशन फेलोज’ संकल्पना
परदेशातील अध्ययन दौरा पूर्ण केल्यानंतर निवडलेले शिक्षक ‘टीचर इनोव्हेशन फेलोज’ म्हणून जिल्ह्यात कार्य करतील. ते इतर शिक्षकांसाठी प्रात्यक्षिक वर्ग, प्रशिक्षण कार्यशाळा आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करतील. तसेच नव्या अध्यापन पद्धतींचा व्यापक प्रसार करतील.

 

 

“शिक्षण क्षेत्र अधिक स्पर्धात्मक होत असताना शिक्षकांचे कौशल्य वाढविणे अत्यावश्यक आहे. या योजनेमुळे शिक्षकांना जागतिक शिक्षण प्रणालीचा अनुभव मिळेल आणि त्याचा थेट फायदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीत होईल.” – गजानन पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे.

 

योजनेचे उद्दिष्ट
* शिक्षकांचा सन्मान व प्रोत्साहन
* जागतिक शिक्षण पद्धतींचा अनुभव
* जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता उंचावणे
* विद्यार्थ्यांना आधुनिक व स्पर्धात्मक शिक्षण उपलब्ध करून देणे

Local ad 1