पुणे : भू-राजकीय संकटाचा सामना करण्यासाठी सहयोग, समन्वय आणि विचारांची देवाणघेवाण करणे ही काळाची गरज आहे. सतत वाढत असलेल्या, नवनवीन भू-राजकीय संकटांशी झुंजत असलेल्या जगात, विचार, संशोधन आणि धोरणांची देवाणघेवाण वाढवणे पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. जागतिक सहकार्याची गरज ओळखून, अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाने (Ajeenkya D.Y. Patil University) (एडीवायपीयू) वॉशिंग्टन डीसी येथील ग्लोबल पॉलिसी इन्स्टिट्यूट (जीपीआय) सोबत एक महत्त्वाचा सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ ही वॉशिंग्टन डीसी येथील प्रतिष्ठित ग्लोबल पॉलिसी इन्स्टिट्यूटशी संलग्न असलेली भारतातील एकमेव संस्था आहे. (Ajeenkya DY Patil University signs MoU with Global Policy Institute)

