पुणे, ता. १२ पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेरो-शायरीच्या माध्यमातून विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकिटे दिल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले. पिंपरी-चिंचवडमध्ये रोड शो आणि त्यानंतर पुण्यात दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले, “तमाम उम्र गालिब ये भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना पूछता रहा…” या शेरो – शायरीद्वारे त्यांनी थेट नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. यावर उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवत दाद दिली. (fadnavis ajitpawar shayari pune election)
फडणवीस पुढे म्हणाले, “एकीकडे कोयता गॅंगमुक्त, गुन्हेगारीमुक्त पुण्याची भाषा केली जाते, आणि दुसरीकडे गुन्हेगारांनाच उमेदवारी दिली जाते. गृहमंत्री म्हणून पुण्यातील गुन्हेगारी मोडून काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही. असे लोक निवडून आले, तरी त्यांची जागा महापालिकेत नव्हे, तर तुरुंगातच असेल.”
भोसरीतील कोपरा सभेतही फडणवीस यांनी “क्यूँ पड़े हो चक्कर में, कोई नहीं टक्कर में”, असे म्हणत अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. आकुर्डीतील सभेत त्यांनी “परिंदे को मिलेगी मंजिल यकीनन…” असा शेर सादर करत विरोधकांवर हल्ला चढवला होता. या शेरो-शायरीच्या शैलीमुळे फडणवीसांची राजकीय टीका अधिक धारदार होत असून, पुणे-पिंपरी परिसरात हा प्रचाराचा मुख्य चर्चेचा विषय ठरत आहे.
अजित पवारांचा प्रत्युत्तर
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शायरीला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार मोशीतील सभेत म्हणाले, “हर पंख फैलाने वाला परिंदा उड नहीं पाता, कई सपने घमंड और गलत दिशा में ही टूट जाते हैं. हुनर की बात करने से कुछ नहीं होता, मैदान में उतरकर साबित करना पड़ता है.” त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या प्रचारात राजकीय संघर्ष शेरो-शायरीच्या माध्यमातून अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे.
❓ प्रश्न-उत्तर (FAQ)
Q1. फडणवीसांनी अजित पवारांवर कशामुळे टीका केली?
👉 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसने तिकिटे दिल्याच्या मुद्द्यावरून.
Q2. फडणवीसांनी कोणती शायरी वापरली?
👉 “तमाम उम्र गालिब ये भूल करता रहा…” आणि “क्यूँ पड़े हो चक्कर में…” अशा शेरांचा वापर.
Q3. अजित पवारांचे प्रत्युत्तर काय होते?
👉 “हर पंख फैलाने वाला परिंदा उड नहीं पाता…” असे म्हणत फडणवीसांच्या शायरीला उत्तर दिले.
Q4. हा वाद कुठे घडला?
👉 पुणे, पिंपरी-चिंचवड, भोसरी, आकुर्डी आणि मोशी येथील प्रचार सभांमध्ये.
Q5. या शायरी-राजकारणाचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
👉 प्रचार अधिक आक्रमक, चर्चेचा विषय आणि सोशल मीडियावर व्हायरल होण्याची शक्यता.

