पुणे Ganeshotsav : गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश काळात (British period) जनजागृती (Awareness) करण्यासाठी, अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी, लोकांना संघटीत करण्यासाठी केली. आपला कोरोनाच्या संकटाशी सामना सुरूच आहे. शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करीत गणेशोत्सव साजरा करावा (Ganeshotsav should be celebrated following the restrictions imposed by the government) असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी केले.
पुणे परिवार या संस्थेच्या वतीने आयोजित लोकमान्य जीवन गौरव, आदर्श गणेशोत्सव कार्यकर्ता, गणेश सेवा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune Police Commissioner Amitabh Gupta).पोलीस उपायुक्त राजेंद्र डहाळे (Deputy Commissioner of Police Rajendra Dahale) स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने (Standing Committee Chairman Hemant Rasane) मंडई गणेशोत्सव (Ganeshotsav) मंडळाचे आण्णासाहेब थोरात, कार्यक्रमाचे संयोजक प्रताप परदेशी उपस्थित होते.
गृहमंत्री वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse Patil) पुढे म्हणाले, पुणे परिवारातर्फे गेल्या 16 वर्षांपासून देण्यात येणारा पुरस्कार हा स्तुत्य उपक्रम आहे. गणेशोत्सव व अन्य क्षेत्रात चांगले काम करणा-या कार्यकर्त्यांना पुरस्कार दिले जातात. सध्या कोरोनाच्या संकटामुळे हा उत्सव मोठया प्रमाणात करता येत नाही. कोणत्याही समाजाचे सण असो, सणाच्या नावावर गर्दी केल्याने तोटा होतो. कोरोना गेला आहे, या विचारात राहून चालणार नाही. मास्क लावा, हात धुवा, सॅनिटायझर वापरा, सामाजिक अंतर ठेवा, हे नियम पाळले पाहिजेत.