संपूर्ण पिका विमा मंजूर करा अन्यथा मोर्चा काढू  : नरगंले 

कंधार kandhar news : नांदेड जिल्ह्यात दि.6 व 7 सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटीमुळे (Heavy rains in Nanded district) शेतकर्‍यांचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यांना या नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्याची गरज असून, राज्य शासनाने संपूर्ण विक विमा मंजूर करावा, (Crop insurance should be sanctioned) तसेच आर्थिक मदत करावी, अन्यथा तिव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशार वंचित बहुजन आघाडीचे नांदेड   जिल्हा अध्यक्ष शिवाभाऊ नरगंले यांनी दिला आहे. (Vanchit bahujan aghadi nanded district president shiva narangale) 

 

 

नरगंले यानी कौठा शिरूर राऊतखेड येथे नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांशी थेट बांधावर जावुन पाहाणी करत संवाद साधला. शेतीचे सरकट पंचनामे करा, नदी-नाल्यांच्या काटावर असलेल्या शेतातील मातीसह पिके वाहुन गेले. त्यामुळे आता शेतीत बाहेरुन माती टाकल्याशिवाय पिके घेता येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने त्या शेतकर्‍यांना विशेष निधी उपलब्ध करुण द्यावा, अशी मागणी करतानाच प्रशासनासह लोकप्रतीनीधीने हायवेवर उभे राहुण फोटो काढण्या पेक्षा शेतकर्‍यांना 100 टक्के पिक विमा मिळवुन द्यावा, अशी मागणी केली.

 

विमान मंजूर न झाल्यास कंधार-लोहा विधानसभा मतदार संघातील शेतकर्‍यांना सोबत घेऊन मोर्चा काढण्याचा इशारा नरगंले यांनी दिला आहे. (Approve the entire crop insurance otherwise take out the front)

 

 

कौठा, शिरुर, राऊतखेड, धानोरा, तेलुर, काटकंळबा, चौकी महाकाया, जाकापुर, गोणार, मसलगा आदी गावांत शेतीसह घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. नदीकाटच्या शेतातील दोन ते तीन फुट मातीसह पिके वाहुन गेली आहे.

 

 

यावेळी शिरुरचे सरपंच  सुधाकर जाधव, राऊतखेडचे सरपंच प्रतिनीधी बाबुराव मडके, बालाजी देशमुख, संतोष देशमुख, रामन कामोले, शिवाजी पालिमकर, भुजंग देशमुख, विलास वाघमारे, हानंमत घोरपडे, गजानन देशमुख, परमेश्वर श्रीकंटवाड, प्रभाकर पांडे, शंकर महाराज, रावसाहेब सुर्यवंशी, केदार कापसे, ईश्वर देशमुख, सुरेश कापसे, माणिक पावडे, पप्पु चोपवाड व शाम देशमुख आदी उपस्थित होते. (Approve the entire crop insurance otherwise take out the front)

Local ad 1