...

“पिंपरी-ससूनला गुडबाय ! बोपोडीत उभे राहणार ट्रॉमा केअर सेंटर”

 

पुणे : अन्न, वस्त्र व निवाऱ्याबरोबरच दर्जेदार आरोग्यसेवा ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज असल्याचे सांगत भाजप–रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे औंध –बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधील उमेदवार चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांनी बोपोडी परिसरात अत्याधुनिक ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याची घोषणा केली आहे. (bopodi trauma care center sunny vinayak nimhan)

 

‘कोऱ्या पाटीवर विकासाची अक्षरे लिहा, विरोधकांना कात्रजचा घाट दाखवा’ : एकनाथ शिंदे

 

बोपोडी परिसरात काढण्यात आलेल्या पदयात्रेदरम्यान नागरिकांशी संवाद साधताना सनी निम्हण म्हणाले की, सध्या बोपोडीतील नागरिकांना गंभीर उपचारांसाठी पिंपरी येथील वाय.सी.एम. हॉस्पिटल, खडकी कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल किंवा पुण्यातील ससून रुग्णालयात जावे लागते. या पार्श्वभूमीवर बोपोडीतच दर्जेदार व तात्काळ उपचार सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे.

 

बोपोडीतील शेवाळे दवाखाना सध्या कार्यरत असला तरी तिथे फक्त ओपीडी असून पुरेशा सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे खेडेकर दवाखान्यात आधुनिक उपकरणांसह ट्रॉमा केअर सेंटर सुरू केले जाईल, तसेच संजय गांधी दवाखाना जो सध्या बांधून तयार असूनही सुरू नाही, तो लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येईल, असा शब्द सनी निम्हण यांनी दिला. बोपोडी परिसराचा सर्वांगीण आणि समतोल विकास करताना नागरिकांची आरोग्यसेवा भक्कम करणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

 

 

Local ad 1