नांदेड जिल्ह्यात भाजपला मोठे खिंडार ; “हा” मोठा नेता जाणार काँग्रेसमध्ये

नांदेड : गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षामध्ये गटबाजी असल्याचे दिसून येत होते. तर देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी देण्यावरून दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले. आता भाजपचे नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आपल्या समर्थकासह भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले असून,  भाजपला मोठा झटका मानला जात आहे. (BJP leader Bhaskarrao Patil Khatgaonkar leaves BJP)

 

 

खातगावर यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

 

 

 

देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वी भाजपातील दुफळी उघड झाली होती. भाजपने शिवसेनेतून आयात करून माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली. हे खातगावर यांना पटले नाही, त्यावरून ते नाराज असल्याची चर्चा सुरू होती.

 

दरम्यानच्या काळात खातगावर यांची भाजपच्या अनेक नेत्यांनी भेट घेऊन मनधरणी केली. परंतु त्यांना अपयश आले आहे. (BJP leader Bhaskarrao Patil Khatgaonkar leaves BJP)

 

 

माजी मंत्री व जेष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाजपचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्याबरोबरच काँग्रेस प्रवेशाची केली घोषणा केली. यावेळी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह भारतीय जनता पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांचीही भाजपला सोडचिठ्ठी दिली.

 

 

यावेळी बोलताना खतगावकर म्हणाले, देगलूर पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर निश्चितपणे विजयी होतील. तसेच मी काँग्रेस पक्ष सोडताना कोणतीही टीका करणार नाही, आता भाजप सोडत आहे, आताही टीका करणार नाही, असे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी भाजप का सोडत आहे, याविषयी एक निवेदन प्रसिद्धीस दिले असून, त्यात कारणे स्पष्ट केली आहेत. (BJP leader Bhaskarrao Patil Khatgaonkar leaves BJP)

 

*LIVE: अशोक चव्हाणांचा नांदेड मध्ये मोठा गेम. भास्करराव पाटील खतगावकर भाजप सोडून कॉंग्रेस मध्ये*
https://fb.watch/8HCv0z29wt/

Local ad 1