स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी झोकून देऊन काम करा : अजित पवार
स्थानिक पातळीवरील युतीचा निर्णय कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार; लाडकी बहीण योजना बंद होणार नाही
पुणे । राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी केले. स्थानिक नेतृत्व व कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच युती करण्यात येईल, अन्यथा पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल, असे त्यांनी स्पष्ट केले. (ajit pawar ncp local body elections 2025 mahila yojana) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २६ वा वर्धापन दिन 2025 बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात मोठ्या उत्साहात पार पडला. समारोपप्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद) प्रभाग रचना काहीही असली तरी ती स्वीकारण्याची मानसिकता ठेवली पाहिजे.”
लाडकी बहीण योजना सत्तेवर असताना बंद होणार नाही
राज्यात महायुती सत्तेत असताना ‘लाडकी बहीण योजना’ बंद होणार नाही, असा शब्द त्यांनी महिलांना दिला. “महिलांना सशक्त करण्यासाठी ही योजना सुरु असून ती चालूच ठेवली जाईल,” असे ते म्हणाले. (स्थानिक स्वराज्य निवडणुका)
2025 विधानसभा : ‘लाडकी बहिण’ योजनेमुळे महायुतीला बहुमत – अजित पवार
कार्यकर्त्यांवर विश्वास, स्वबळाचा इशारा
पवार पुढे म्हणाले की, “पक्ष कार्यकर्त्यांच्या जीवावर मोठा झाला आहे. त्यामुळे त्यांच्या इच्छेनुसारच निर्णय घेण्यात येतील. कार्यकर्त्यांनी संधीस पात्र ठरावे, म्हणून सदस्य नोंदणी मोहिमेत सक्रिय भाग घ्या. राज्यात १ कोटी नव्या सदस्यांची नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे.”
महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालणाऱ्यांना ‘मोक्का’खाली कारवाई !
महत्त्वाच्या ठरावांना एकमताने मंजुरी
या मेळाव्यात दोन ठराव संमत करण्यात आले: पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या सिंदूर ऑपरेशनचे कौतुक. मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा गौरव आणि एनडीएमध्ये राष्ट्रहिताच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयास पाठिंबा.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती आणि भाषणे
या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक, खासदार सुनेत्रा पवार, मंत्री आदिती तटकरे, आमदार चेतन तुपे, रुपाली चाकणकर, सयाजी शिंदे यांची उपस्थिती होती. तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील व रामराजे निंबाळकर अनुपस्थित होते.
प्रफुल्ल पटेल म्हणाले, “जिथे युती शक्य आहे तिथे ती होईल, अन्यथा स्वबळावर ताकदीनं लढू. आम्ही विचारधारा सोडलेली नाही आणि अल्पसंख्याक, ओबीसी, आदिवासी यांना संधी देतच राहू.”
विशेष लक्षवेधी बाबी
महिला कार्यकर्त्यांना अधिक संधी मिळणार
विधानसभा निवडणुकीतील यशावर भरवसा
४ महिन्यात सदस्य नोंदणीची मोहीम
मेळाव्यास हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती
प्रभाग रचना स्विकारण्याची वेळ
अजित पवार यांच्या भाषणाने आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतंत्र आणि आत्मविश्वासपूर्ण लढा याची झलक स्पष्ट झाली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर भर देत त्यांनी पक्षशिस्त व एकनिष्ठतेला प्राधान्य दिले आहे.