...

‘गुन्हेगाराची पत्नी असली तर दोष काय?’ अजित पवारांचा थेट सवाल, टीकेला जोरदार प्रत्युत्तर

पुणे : ‘कोणी गुन्हेगार असल्यास त्याच्या पत्नी किंवा कुटुंबीयांचा दोष काय?’ असा प्रतिप्रश्न उपस्थित करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत सविस्तर भूमिका मांडली. (ajit pawar clarification criminal background candidates pune municipal election)

 

 

पुण्याच्या कारभारावर अजित पवार संतापले; म्हणाले, ‘हे त्रिकूट हटवा, विकास हवा तर सत्ता बदला !

 

 

निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) सोबत आघाडी करण्यात आली असून, त्यानुसार काही जागा त्यांना देण्यात आल्या आहेत. ‘मी गुन्हेगारांना उमेदवारी दिलेली नाही. मात्र रिपाइंने संबंधित उमेदवारांना “घड्याळ” चिन्हावर निवडणूक लढविण्यास सांगितले,’ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून गजानन मारणे यांची पत्नी जयश्री मारणे, बंडू आंदेकर यांची स्नुषा सोनाली आंदेकर आणि भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यापैकी सोनाली आणि लक्ष्मी या दोघी कारागृहातून निवडणूक लढवत आहेत. या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर तीव्र टीका होत आहे.

 

 

या टीकेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, ‘शहरातील गुन्हेगारी संपली पाहिजे, असे सांगणारेच आज टीका करत आहेत. मात्र त्यांच्या भूमिकेत सातत्य आहे का, हे त्यांनीच स्पष्ट करावे.’ केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना पवार म्हणाले, ‘प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. मात्र एक घायवळ नावाची व्यक्ती परदेशात कशी पळून गेली, याचे उत्तर त्यांनी द्यावे.’

 

पुणे महापालिकेत राजकीय भूकंप! महायुती नाही, आघाड्यांचं गणित विस्कटलं

 

 

मुंढवा येथील शासकीय जमीन खरेदी प्रकरणात पुत्र पार्थ पवार यांचे नाव पुढे आल्याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, ‘या प्रकरणात कोणताही व्यवहार झालेला नाही. चौकशी सुरू आहे. मी कधीही चुकीच्या गोष्टींचे समर्थन केलेले नाही. मुंढवा प्रकरणाची चौकशी झाली, पण “जय जिनेंद्र” प्रकरणाबाबत काय झाले, हे सगळ्यांना माहिती आहे,’ असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुरलीधर मोहोळ यांच्यावर निशाणा साधला.

 

 

दरम्यान, पैशांचे वाटप केल्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल झाल्याच्या मुद्द्यावर अजित पवार म्हणाले, ‘प्रचाराची वेळ संपल्यानंतर रात्री दहानंतर प्रचार झाल्याची तक्रार होती. त्यामुळे पक्षाच्या सर्व उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना रात्री दहानंतर प्रचार करू नका, अशी स्पष्ट सूचना दिली आहे.’

 

 

 

 

❓ प्रश्न–उत्तर (Q&A)

प्रश्न 1 : अजित पवार यांनी नेमके काय समर्थन केले?
उत्तर : गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या पत्नी किंवा कुटुंबीयांना उमेदवारी दिल्याचे समर्थन त्यांनी केले.

प्रश्न 2 : अजित पवार यांनी गुन्हेगारांना थेट उमेदवारी दिली का?
उत्तर : नाही. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांनी थेट गुन्हेगारांना उमेदवारी दिलेली नाही.

प्रश्न 3 : कोणत्या उमेदवारांवरून वाद निर्माण झाला आहे?
उत्तर : जयश्री मारणे, सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांच्या उमेदवारीवरून वाद निर्माण झाला आहे.

प्रश्न 4 : मुरलीधर मोहोळ यांनी काय टीका केली होती?
उत्तर : गुन्हेगारी संपवण्याची भाषा करणाऱ्यांनीच गुन्हेगारांच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रश्न 5 : ‘जय जिनेंद्र’ प्रकरणावर अजित पवार काय म्हणाले?
उत्तर : त्या प्रकरणाबाबत काय झाले, हे सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली.

 

Local ad 1