...

वाहन बाजारावर मंदीचे सावट ; गुढीपाडव्याला पुण्यात खरेदीत घसरण !

 

पुणे : साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर यंदा पुण्यात वाहन खरेदीत घट झाल्याचे चित्र समोर आले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आकडेवारीनुसार, ७ ते १७ मार्च २०२६ या कालावधीत एकूण ११ हजार ९३७ वाहनांची खरेदी झाली. त्यामध्ये १ हजार ५३० इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा वाहन खरेदीत सुमारे १२ टक्क्यांनी घट झाली असून, आखाती देशांतील युद्ध परिस्थिती आणि त्याचा आर्थिक परिणाम यामागे कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. (gudipadwa 2026 pune vehicle sales drop 12 percent electric vehicles decline)

 

पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा दबदबा ; अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड बिनविरोध

 

गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दिवाळी या सणांच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करण्याची परंपरा कायम असली, तरी यंदा ग्राहकांचा उत्साह तुलनेने कमी दिसून आला. सणाच्या काही दिवस आधी वाहन नोंदणी करून गुढीपाडव्याच्या दिवशी वाहन घरी आणण्याची पद्धत यंदाही कायम होती.

 

पेट्रोल-डिझेल वाहनांमध्ये मोठी घट

सन २०२५ मध्ये १३ हजार १९० पेट्रोल-डिझेल वाहनांची खरेदी झाली होती. यंदा ही संख्या ११ हजार ९३७ वर आली असून, तब्बल १ हजार २५३ वाहनांची घट नोंदवली गेली आहे. मोटारसायकल, कार, ऑटो रिक्षा आणि मालवाहू वाहनांच्या खरेदीत घट झाली आहे.

 

इलेक्ट्रिक वाहनांची मागणी ही घसरली

इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीतही यंदा घट दिसून आली. २०२५ मध्ये २ हजार १२४ वाहनांची खरेदी झाली होती, तर २०२६ मध्ये ही संख्या १ हजार ५३० वर आली आहे. म्हणजेच ५९४ वाहनांची घट झाली आहे.

 

एकूण खरेदीत १,८४७ वाहनांची घट

पेट्रोल-डिझेल आणि इलेक्ट्रिक या दोन्ही प्रकारांमध्ये मिळून एकूण १ हजार ८४७ वाहनांची घट झाली आहे. विशेषतः मोटारसायकल, कार, तीनचाकी मालवाहू आणि ऑटो रिक्षा या विभागांमध्ये मोठी घट नोंदवली गेली आहे.

“दरवर्षीप्रमाणे यंदाही मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू आहे. आरटीओ कार्यालयामार्फत कागदपत्रांची तपासणी करून वाहन नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.”
— स्वप्निल भोसले, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

 

 पेट्रोल-डिझेल वाहन खरेदी तुलना

वाहन प्रकार २०२५ २०२६
मोटारसायकल ८२६० ७९८६
मोटार कार ३३३२ २२६०
पर्यटक टॅक्सी २८० २८७
बस ९४ ४४
ऑटो रिक्षा ३६२ २६७
मालवाहू ५९० ४५७
तीनचाकी मालवाहू ८५ ६९
ट्रॅक्टर ९६
इतर ९१ १६७
एकूण १३,१९० ११,९३७

इलेक्ट्रिक वाहन खरेदी तुलना

वाहन प्रकार २०२५ २०२६
मोटारसायकल १७६८ १२७६
मोटार कार ३११ २२६
पर्यटक टॅक्सी १२
बस
ऑटो रिक्षा २२
मालवाहू
तीनचाकी मालवाहू १८
एकूण २,१२४ १,५३०

 

 

 

 

Local ad 1