...

मोठा निर्णय ! आता ‘हा’ सहकारी संघ ओळखला जाणार ‘अजितदादा पवार’ नावाने

 

पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित (कात्रज) या संघाचे नामकरण आता ‘अजितदादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कात्रज’ असे करण्यात येणार आहे. संघाच्या संचालक मंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वानुमते घेतला असून सहकार क्षेत्रातील दिवंगत अजितदादा पवार यांच्या योगदानाच्या सन्मानार्थ हा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती संघाकडून देण्यात आली. रोजी अजितदादा पवार यांचे २८ जानेवारी २०२६ अपघाती निधनानंतर सहकार क्षेत्रात शोककळा पसरली होती. पुणे जिल्ह्यातील सहकारी चळवळीसाठी ही हानी कधीही न भरून निघणारी असल्याची भावना संघाने व्यक्त केली आहे. (katraj dudh sangh ajitdada pawar namkaran pune)

 

मेट्रो, नदी सुधार, शहर बदलणार ? बिडकरांनी मांडला विकासाचा रोडमॅप

 

दूध संघाच्या माहितीनुसार, अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील सहकार चळवळीला सातत्याने मार्गदर्शन केले. संघाच्या वार्षिक सभांमध्ये त्यांची उपस्थिती लाभली होती. संस्थेचा विस्तार, प्रशासकीय समन्वय आणि कार्यपद्धती बळकट करण्यासाठी त्यांनी मोलाचे पाठबळ दिल्याचे नमूद करण्यात आले. पवार कुटुंबाचेही सहकार क्षेत्राशी असलेले सातत्यपूर्ण संबंध अधोरेखित करण्यात आले.

 

संघाच्या विकासातील महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये विशेषतः पायाभूत सुविधा उभारणी आणि दीर्घकालीन नियोजनासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेत अजितदादांची भूमिका महत्त्वाची होती, अशी माहिती संघाने दिली. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकारी संस्थांना सक्षम बनवण्याच्या व्यापक दृष्टिकोनातून त्यांनी दिलेले पाठबळ कायम स्मरणात राहील, अशी भावना पदाधिकारी आणि संचालकांनी व्यक्त केली.

 

दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी चेअरमन अॅड. स्वप्नील ढमढेरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत हा ठराव मांडण्यात आला. या बैठकीस व्हा. चेअरमन तानाजी जगताप यांच्यासह गोपाळराव अण्णा म्हस्के, विष्णुकाका हिंगे, बाळासाहेब नेवाळे, बाळासाहेब खिलारी, केशरताई पवार, भगवान बाप्पू पासलकर, दिलीप नाना थोपटे, राहुल दिवेकर, भाऊसाहेब देवाडे, अरुण चांभारे, कालिदास गोपाळघरे, निखिल तांबे, लताताई गोपाळे, चंद्रकांत भिंगारे आदी संचालक उपस्थित होते. सर्व उपस्थित सदस्यांनी ठरावाला एकमताने मंजुरी दिली.

 

संघाने स्पष्ट केले की, हा निर्णय केवळ नामांतरापुरता मर्यादित नसून सहकार क्षेत्रासाठी केलेल्या योगदानाचा सन्मान आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी नेतृत्वाची स्मृती जपण्याचा प्रयत्न आहे. नामकरणासंदर्भातील आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया आणि परवानग्यांची कार्यवाही संबंधित स्तरावर लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

 

 

 

 

Local ad 1