ZP Elections 2026 | मुंबई : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असून, जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण मात्र गेल्याच वर्षी म्हणजे २०२५ मध्ये जाहीर करण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशांमुळे प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया २०२६ मध्ये राबविण्यात येत आहे. कोणत्या जिल्ह्यात अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले आहे, तर कुठे महिलांसाठी राखीव आहे, यावरून राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी आपापली राजकीय रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेसाठी उमेदवारांची जुळवाजुळव केली जात आहे. सध्या राज्यातील कवेळ १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहे.तर उर्वरित जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली असल्याने न्यायालयाच्या निर्णय झाल्यानंतर होणार आहेत. (zp elections 2026 district wise president reservation maharashtra)
पुण्याचे महापौर टिळेकर, तापकीर, देशपांडे की आणखी कोण? । Pune Mahapaur News Marathi
ठाणे, कोल्हापूर, सांगली, लातूर, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तर पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले राहणार आहे. या आरक्षणामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक नेत्यांची गणितं कोलमडली असून, काही ठिकाणी नव्या नेतृत्वाला संधी मिळणार हे निश्चित झाले आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट व अजित पवार गट) तसेच शिवसेना (उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गट) या सर्व पक्षांत उमेदवारी आणि सत्ता-समीकरणांवर मंथन सुरू आहे.
दहावी–बारावीच्या परीक्षेत कॉपी? एक चूक आणि संपूर्ण परीक्षा केंद्र रद्द !
२०२५ मध्ये जाहीर झालेले जिल्हानिहाय अध्यक्षपद आरक्षण
ठाणे – सर्वसाधारण (महिला)
पालघर – अनुसूचित जमाती
रायगड – सर्वसाधारण
रत्नागिरी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
नाशिक – सर्वसाधारण
धुळे – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
नंदुरबार – अनुसूचित जमाती
जळगाव – सर्वसाधारण
अहमदनगर – अनुसूचित जमाती (महिला)
पुणे – सर्वसाधारण
सातारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सांगली – सर्वसाधारण (महिला)
सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोल्हापूर – सर्वसाधारण (महिला)
छत्रपती संभाजीनगर – सर्वसाधारण
जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
बीड – अनुसूचित जाती (महिला)
हिंगोली – अनुसूचित जाती
नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग
धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
लातूर – सर्वसाधारण (महिला)
अमरावती – सर्वसाधारण (महिला)
अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
परभणी – अनुसूचित जाती
वाशिम – अनुसूचित जमाती (महिला)
बुलढाणा – सर्वसाधारण
यवतमाळ – सर्वसाधारण
नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
वर्धा – अनुसूचित जाती
भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
गडचिरोली – सर्वसाधारण (महिला)
❓ प्रश्न–उत्तर
प्रश्न 1: जिल्हा परिषद निवडणूक २०२६ कधी होणार आहे?
👉 न्यायालयीन आदेशांनुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका २०२६ मध्ये घेण्यात येणार आहेत.
प्रश्न 2: जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण कधी जाहीर झाले?
👉 अध्यक्षपदांचे आरक्षण २०२५ मध्येच जाहीर करण्यात आले होते.
प्रश्न 3: कोणत्या जिल्ह्यांत अध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे?
👉 ठाणे, कोल्हापूर, सांगली, लातूर, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली येथे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे.
प्रश्न 4: पुणे जिल्ह्यात अध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी आहे?
👉 पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले आहे.
प्रश्न 5: आरक्षणाचा राजकारणावर काय परिणाम होणार आहे?
👉 अनेक जिल्ह्यांत स्थानिक नेत्यांची समीकरणे बदलणार असून, काही ठिकाणी नव्या नेतृत्वाला संधी मिळणार आहे.

