प्रशिक्षणार्थी महिलांनी वारीतील वयोवृद्ध वारकऱ्यांची केली मसाज सेवा
बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचा पुढाकार
पुणे, हडपसर : बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, हडपसर (पुणे) यांच्या मार्फत ग्रामीण भागातील युवक, युवती व महिला बचत गटांसाठी मोफत व्यवसाय प्रशिक्षण दिले जाते. संस्थेमार्फत ब्युटीपार्लर, टेलरिंग, फास्टफूड स्टॉल, ज्वेलरी बनविणे, भरतकाम, फॅब्रिक पेंटिंग, तसेच फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी, मेन्स पार्लर, घरगुती वायरिंग आणि विद्युत उपकरण दुरुस्ती अशा विविध कोर्सेसचे आयोजन केले जाते. (bank of maharashtra free training wari service)
सध्या संस्थेत ‘ब्युटी पार्लर व्यवस्थापन’ या कोर्सचे निवासी प्रशिक्षण सुरू आहे. ३५ महिला व मुली येथे प्रशिक्षण घेत आहेत. प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून, राहण्याची, जेवणाची आणि प्रशिक्षण साहित्याचीही संपूर्ण व्यवस्था संस्थेमार्फत केली जाते.
पुण्यात जाहिरात फलकांसाठी बेकायदा वीजजोड ; महापालिकेच्या तपासणीत फक्त ८७ प्रकरणे उघड
यंदा आषाढी वारीसाठी आळंदी आणि देहू येथून पालख्या प्रस्थान झाल्या असून, लाखो भाविक पायी वारी करत आहेत. या पार्श्वभूमीवर संस्थेच्या प्रशिक्षणार्थींनी सामाजिक जाणीव ठेवून वारीतील वयोवृद्ध वारकऱ्यांसाठी विशेष उपक्रम राबविला. सकाळपासून ४०० ते ५०० वारकऱ्यांना डोक्याची, पायांची व तळव्यांची मसाज सेवा देण्यात आली. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून प्रशिक्षणार्थींनाही मोठे आत्मिक समाधान मिळाले.
रस्त्यावरील माईलस्टोन चे रंग काय सांगतात? – जाणून घ्या रस्त्यांच्या प्रकारांची ओळख
हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपत प्रशिक्षणातून मिळालेल्या कौशल्याचा उपयोग सेवा कार्यासाठी कसा करता येतो याचे उत्तम उदाहरण ठरतो.