पुणे : मागील आठ दिवसांपासून खडकवासला जलप्रकल्पाच्या जलग्रहण क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे सुमारे १० टीएमसी (थाउजंड मिलियन क्यूबिक फूट) पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा केवळ ३.५७ टीएमसी इतका होता. त्यामुळे यंदाचा साठा मागील वर्षीच्या तुलनेत ६.६६ टीएमसीने अधिक आहे. पुणे शहराची मासिक जलगरज सुमारे १.५ टीएमसी इतकी आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेला साठा पुणेकरांच्या चार महिन्यांच्या गरजेसाठी पुरेसा आहे.(khadakwasla pani satha june 2025)
साहित्य, समाज आणि संस्कृतीसाठी डॉ. सबनीस यांचे योगदान अमूल्य – शरद पवार
खडकवासला साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांमध्ये जलसाठा झपाट्याने वाढत आहे. २२ जून सकाळपर्यंत एकूण साठा १०.१७ टीएमसी (३४.८७%) झाला आहे. यावर्षी मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळेही काही प्रमाणात पाणीसाठा वाढला आहे.
धरणांनुसार जलसाठा (२२ जूनपर्यंत) :
धरण जलसाठा (टीएमसी) टक्केवारी
खडकवासला १.२६ – ६३.६०%
पानशेत ३.२२ – ३०.२१%
वरसगाव ५.०५ – ३९.४०%
टेमघर ०.६४ – १७.३१%
एकूण १०.१७ – ३४.८७%
यंदा धरणे लवकर भरण्याची शक्यता
साधारणपणे दरवर्षी ही धरणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टमध्ये भरतात. परंतु यंदा जून महिन्यांच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाची सुरुवात झाली. त्यामुळे यंगा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत धरणे भरून जातील, अशी शक्यता आहे. त्यामुळे पुणे शहराला वर्षभरासाठी पाण्याची चिंता भेडसावण्याची शक्यता कमी झाली आहे.