...

रस्त्यावरील माईलस्टोन चे रंग काय सांगतात? – जाणून घ्या रस्त्यांच्या प्रकारांची ओळख

माईलस्टोन चे रंग आणि रस्त्यांचा प्रकार 

पुणे : आपण अनेकदा प्रवास करताना रस्त्याच्या कडेला उभे असलेले माईलस्टोन (दगडी मैलाचे खांब) पाहतो. मात्र, या माईलस्टोनवरील रंग कोडिंगमधून त्या रस्त्याचा प्रकार ओळखता येतो, हे अनेकांना माहिती नसते. शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार भारतातील रस्त्यांचे चार प्रमुख प्रकार आहेत आणि त्यांच्या माईलस्टोनवर विशिष्ट रंगांच्या साहाय्याने त्या प्रकारांचे संकेत दिलेले असतात. (road milestone color meaning marathi)

फोटो फिचर : पुण्यातील ‘भक्तीयोग’ कार्यक्रमातून मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोग्य मंत्र

 

माईलस्टोन चे रंग आणि रस्त्यांचा प्रकार

1) काळा आणि पांढरा रंग – जिल्हा मार्ग (District Road)  जिल्ह्यातील अंतर्गत भागांमध्ये एक गाव दुसऱ्या गावाशी जोडण्यासाठी हे रस्ते वापरले जातात. यांची देखभाल संबंधित जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येते. 

2) पिवळा आणि पांढरा रंग – राष्ट्रीय महामार्ग (National Highway) : हे रस्ते भारत सरकारच्या अधिपत्याखाली येतात. ते देशाच्या विविध राज्यांना, महत्त्वाच्या शहरांना एकत्र जोडतात. या रस्त्यांवर प्रवास वेगाने आणि सुलभपणे होतो.

3) हिरवा आणि पांढरा रंग – राज्य महामार्ग (State Highway) : हे रस्ते एखाद्या राज्यातील जिल्ह्यांना किंवा मुख्य शहरांना एकमेकांशी जोडतात. या रस्त्यांची जबाबदारी राज्य सरकारकडे असते.

4) लाल आणि पांढरा रंग – धोकादायक रस्ता (Danger Prone Road) : या रंगातील माईलस्टोन हे त्या रस्त्यावर अपघाताची शक्यता जास्त असल्याचे दर्शवतात. अशा रस्त्यांवर सावधगिरीने वाहन चालवणे अत्यंत आवश्यक असते.

 

 

road milestone color meaning marathi
road milestone color meaning marathi

 

अशी करा रस्त्याची ओळख

पुढच्या वेळी तुम्ही कुठेही प्रवास करत असाल आणि रस्त्याच्या बाजूला माईलस्टोन दिसले, तर त्यावर असलेला रंग लक्षात घ्या. तो तुम्हाला त्या रस्त्याचा प्रकार सांगेल. ही छोटीशी माहिती अपघातापासून वाचवू शकते, तसेच प्रवास अधिक नियोजित करण्यास मदत करू शकते.

पुणे महापालिकेत टीडीआर घोटाळा; नगरविकास विभागाने मंजूर प्रस्तावांची माहिती मागवली  

 

 

 

 

Local ad 1