फोटो फिचर : पुण्यातील ‘भक्तीयोग’ कार्यक्रमातून मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोग्य मंत्र
जागतिक योग दिनानिमित्त आषाढी वारीत 'भक्तीयोग' उपक्रम
पुणे , २१ जून २०२५ : “योग ही आपल्या परंपरेची गुरुकिल्ली आहे. भक्ती आणि योग याच्या माध्यमातून आरोग्यदायी, निरोगी समाज घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करायला हवेत,” असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी जागतिक योग दिनाच्या निमित्ताने केले. (pune cm devendra fadnavis on yoga day wari 2025)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी, आणि श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वारकरी भक्तीयोग’ या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, “योग शरीर आणि मनासाठी पुनरुज्जीवन देणारी शास्त्रशुद्ध चिकित्सा पद्धती आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रात योग दिनाची संकल्पना मांडली, आणि ती संपूर्ण जगाने स्वीकारली. यंदाच्या योग दिनाचे घोषवाक्य ‘एक भूमी, एक आरोग्य’ हे वारकरी संप्रदाय कृतीतून दाखवत आहे.”
पुण्यातील १८७ महाविद्यालयांतील ६ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग. दिंड्या मुक्कामी ठिकाणी वारकऱ्यांचा सामूहिक योगाभ्यास. योग प्रशिक्षक डॉ. पल्लवी कव्हाणे यांच्या पथकाद्वारे योग सत्र. ताडासन, भुजंगासन, कपालभाती, अर्धशलभासन आदी योगासने. अभंग गायनाने जागतिक संगीत दिन साजरा करण्यात आला.
आषाढी वारी 2025 : पुण्यात २१ हजारांहून अधिक वारकऱ्यांना वैद्यकीय मदत
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, डॉ. सदानंद मोरे, नवल किशोर राम, अमितेश कुमार, जितेंद्र डुडी, शीतल तेली उगले, राजेश पांडे, गहिनीनाथ औसेकर, भीमराव तापकीर, हेमंत रासने, पराग काळकर, ॲड. राजेंद्र उमाप आदी.