पुणे महापालिकेच्या झाडणकामाच्या निविदांवर ‘रिंग’चा वाद; आता फेरनिविदा जुन्या अटींसह

विवादास कारणीभूत ठरलेल्या नव्या अटी हटवून, दहा टक्के वाढीव दराने फेरनिविदा काढण्याचा वित्तीय समितीचा निर्णय

पुणे : शहरातील १२ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये रस्ते आणि गल्लीबोळ झाडण्यासाठी महापालिकेने फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीच्या निविदा प्रक्रियेमध्ये ठेकेदारांनी ‘रिंग’ तयार केल्याचा संशय व्यक्त झाला होता. त्यामुळे ही प्रक्रिया वादात सापडली होती. गुरुवारी झालेल्या वित्तीय समितीच्या बैठकीत जुन्या अटी-शर्तींच्या आधारावर फेरनिविदा काढण्यास मंजुरी देण्यात आली. या निविदांमध्ये दहा टक्के वाढीव दराने कामे देण्याचेही ठरविण्यात आले.

 

महावितरणची वीजबिले आता डिजिलॉकर मध्ये उपलब्ध ; मोबाईलवरच पाहा अन् डाउनलोड करा

 

दरवर्षी महापालिकेकडून झाडणकामासाठी निविदा काढण्यात येतात. मात्र यंदा निविदा अटींमध्ये मोठे बदल करून काही विशिष्ट ठेकेदारांसाठी सोयीस्कर अटी घालण्यात आल्या होत्या. उदाहरणार्थ, निविदा जाहीर होण्यापूर्वीच सर्व प्रमाणपत्रे तयार ठेवणे व स्पायडर मशिन आधीच खरेदी केलेली असणे या अटी अनिवार्य केल्या होत्या. त्यामुळे नवोदित किंवा इतर इच्छुक ठेकेदार वगळले जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. (pune sweeping tender dispute reinvite 2025)

 

या प्रक्रियेमुळे काही प्रमुख ठेकेदारांनी एकत्र येऊन क्षेत्रीय कार्यालये वाटून घेतल्याचे निदर्शनास आले. काहींना एक, तर काहींना दोन कार्यालये मिळणार असल्याचा संकेत मिळाल्याने ही प्रक्रिया वादग्रस्त ठरली. (pune sweeping tender dispute reinvite 2025)

 

महत्वाचे ! महाराष्ट्रातील महानगरपालिका व नगरपरिषद प्रभाग रचना कार्यक्रम २०२५ जाहीर

 

या पार्श्वभूमीवर तत्कालीन आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी अटी-शर्तींच्या फेरआढाव्यासाठी तांत्रिक समिती नेमली होती. आता या अहवालाच्या आधारे, जुन्या आणि सर्वसमावेशक अटी लागू करून नवीन फेरनिविदा काढण्यात येणार आहेत. धनकवडी व परीमंडळ १ वगळता इतर १२ क्षेत्रीय कार्यालयांतील झाडणकामांसाठी ही फेरनिविदा प्रकिया राबवली जाणार आहे.

Local ad 1