पुणे महापालिकेत गोंधळ केल्याप्रकरणी ६ जणांवर बंदी
दिव्यांग प्रतिनिधीचाही समावेश
पुणे : महिला अधिकाऱ्यांना मानसिक त्रास देणाऱ्या प्रकरणात कारवाईचा बडगा उगारत पुणे महानगरपालिकेने भाजपचे कामगार आघाडीचे शहराध्यक्ष ओंकार कदम यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर महापालिका भवन व संलग्न मिळकतींमध्ये प्रवेशबंदी केली आहे. या कारवाईत पाच कंत्राटी कर्मचारी व एक दिव्यांग प्रतिनिधी यांचाही समावेश आहे. (onkar kadam mahapalika praveshbandi 2025)
महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालणाऱ्यांना ‘मोक्का’खाली कारवाई !
महापालिकेच्या आरोग्य विभागात १७ फेब्रुवारी रोजी कदम व त्यांच्या समर्थकांनी महिला अधिकाऱ्यांचे चित्रीकरण करत धमकी दिल्याचा आरोप आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत सुरक्षा विभाग, भाजप नेते आणि राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतरही त्रास सुरू राहिल्याने महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी कठोर पावले उचलली. (onkar kadam pune mahapalika pravesh bandi 2025)
महानगरपालिकांमध्ये आता चार सदस्यीय प्रभाग अनिवार्य – शासनाचा मोठा निर्णय
कदम यांच्यासोबत उपस्थित असलेले विशाल जाधव, रेखा ससाणे, सविता पवार, रेश्मा चिल्लाळ, सारिका गोरड (सर्व कंत्राटी कर्मचारी) व मिना धोत्रे (दिव्यांग प्रतिनिधी) यांच्यावर प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. महापालिकेच्या सुरक्षा विभागाने शिवाजीनगर पोलिसांना यासंदर्भात कळवले असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार आहे.
2025 विधानसभा : ‘लाडकी बहिण’ योजनेमुळे महायुतीला बहुमत – अजित पवार
विशाखा समितीची सुनावणी
या प्रकरणावर महापालिकेतील विशाखा समितीने मंगळवारी सुनावणी घेतली. या वेळी दोन महिला अधिकाऱ्यांनी साक्ष दिली. मुख्यमंत्री कार्यालयानेही कठोर कारवाईचे निर्देश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. (onkar kadam pune mahapalika pravesh bandi 2025)