...

पुणे पुन्हा राजकीय केंद्रबिंदू ! शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचा शक्तीप्रदर्शन मेळावा

शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची पत्रकार परिषदेत माहिती

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यंदा आपला २६ वा वर्धापन दिन पुणे शहरात मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, तसेच अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते या भव्य मेळाव्यासाठी पुण्यात दाखल होणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

या पत्रकार परिषदेला माजी आमदार जयदेवराव गायकवाड, माजी महापौर अंकुश काकडे, रविंद्र माळवदकर, श्रीकांत पाटील, विशाल तांबे आदी उपस्थित होते.

 

फुलबाजार परवाना घोटाळा !। संचालक मंडळाच्या नातेवाईकांना नियमबाह्य परवाने ?

 

१० जून रोजी सकाळी १०:१० वाजता शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी भवन येथे ध्वजारोहण, त्यानंतर बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी १०:३० ते दुपारी १:१० दरम्यान भव्य मेळावा होणार आहे. (ncp 26th foundation day pune 2025)

 

पुणे शहरात पहिल्यांदाच वर्धापन दिनाचे यजमानपद लाभल्याने हा कार्यक्रम विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा हा कार्यक्रम ठरणार असल्याचा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.

 

Local ad 1