...

दिवाळी फराळ घोटाळा : कैद्यांच्या नावावर ५ कोटींची खरेदी !

 कारागृहात ५ कोटींचा दिवाळी फराळात भ्रष्टाचार झाल्याचा माजी खासदार राजू शट्टे यांचा आरेप

Jail Diwali Faral Scam 2024। राज्यातील कारागृहांमध्ये कैद्यांच्या नावावर दिवाळी फराळाच्या खरेदीमध्ये तब्बल ५ कोटी रूपयांची खरेदी झाली. यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप स्ववाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी (Former MP Raju Shetty) यांनी सोशल मिडियावर पोस्ट करुन केला आहे.

 

राजू शेट्टी यांनी केलेल्या पोस्टमध्ये कारागृह विशेष पोलिस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता व वरिष्ठ अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या आदेशानुसार कैद्यांना विशेष फराळ देण्यात आला. यामध्ये १२०० रुपये किलो दराने काजूकतली, तसेच चकली, शंकरपाळी, बेसन लाडू यांसारखी इतर पारंपरिक खाद्यपदार्थ सामील होते. मात्र कैद्यांनी यातील अनेक पदार्थ खाल्लेच नाहीत, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 

पुणे मनपामध्ये तब्बल ७३३६ पदे रिक्त ; कामकाजावार होतोय परिणाम !

 

 

काय आहे आरोप?

कैद्यांना दिलेला फराळ हा काका हलवाई, हल्दीराम आणि चितळे बंधू यांच्या दरपत्रकाप्रमाणे बिल करण्यात आला. प्रत्यक्षात त्यांना दिलेले फराळाचे साहित्य हे स्थानिक मार्केटमधून कमी दर्जाचे आणि ४०-६०% कमी दराचे होते. कोणतीही निविदा प्रक्रिया न करता थेट खरेदी करण्यात आली. एकूण खर्च सुमारे ५ कोटी रुपये, पण वस्तूंची गुणवत्ता आणि किंमत यामध्ये प्रचंड तफावत.

 

Jail Diwali Faral Scam 2024

 

खालील दरपत्रकावरून फरक स्पष्ट

दाखल केलेल्या दरपत्र
काजूकतली – ₹१२००/किलो
चकली – ₹५००/किलो
बेसन लाडू – ₹३६५/किलो
रवा पेढा – ₹६००/किलो

 

या प्रकरणात उपस्थित होत असलेले प्रश्न

  • हे साहित्य कोणत्या विक्रेत्याकडून घेण्यात आले?
  • निविदा प्रक्रिया का नाही राबवली?
  • कैद्यांना प्रत्यक्ष दिले गेलेले साहित्य व प्रत्यक्ष खरेदी यामध्ये तफावत का?
  • या सर्व वस्तू स्थानिक बाजारात ३०–५०% कमी दराने सहज उपलब्ध आहेत.

 

 

Local ad 1