...

पुणे मनपामध्ये तब्बल ७३३६ पदे रिक्त ; कामकाजावार होतोय परिणाम !

भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता

पुणे – पुणे महानगरपालिकेतील वर्ग १ ते वर्ग ४ या सर्व श्रेणींमध्ये मिळून १६,३६९ पदे मंजूर असताना, त्यातील तब्बल ७३३६ पदे रिक्त असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ही भरती रखडल्याने महापालिकेच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता असून, यासाठी लवकरच आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे, अशी माहिती उपायुक्त प्रसाद काटकर यांनी दिली आहे. (pmc 7336 posts vacant recruitment update 2025)

 

pmc 7336 posts vacant recruitment update 2025
pmc 7336 posts vacant recruitment update 2025

 

🏗️ कनिष्ठ अभियंता भरती रखडलीच…

महापालिकेने मार्च २०२५ मध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी ११३ जागांची भरती जाहिरात प्रसिद्ध केली होती. (recruitment update 2025) यासाठी IBPSच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागवले गेले. तब्बल २८,७०० उमेदवारांनी अर्ज सादर केले आणि यामुळे महापालिकेला २.७८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. परंतु, मराठा आरक्षण, निवडणूक आचारसंहिता, तसेच काही तांत्रिक अडचणींमुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती. (Pune Municipal Corporation Recruitment)

 

 

🗣️ प्रशासनाचे स्पष्टीकरण:

“वेळी उद्भवलेल्या विविध अडचणींमुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती. सध्या या अडथळ्यांचा निरसन करण्यात आले आहे. त्यामुळे आता ही भरती प्रक्रिया पुढे राबविण्यासाठी परीक्षा घेण्याबाबतचा प्रस्ताव मनपा आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर शक्य तितक्या लवकर परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येईल.” (पुणे महापालिका भरती)

— प्रसाद काटकर, उपायुक्त (सामान्य प्रशासन), पुणे महानगरपालिका

हिंजवडी ते छत्रपती संभाजीनगर थेट एसटी सेवा सुरु ; आयटी कर्मचाऱ्यांना वीकेंडला दिलासा

 

📊 मागील दोन वर्षांतील भरतीची आकडेवारी

2022-23 मध्ये 448 जागांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती, त्यातील 445 जागा भरल्या गेल्या.

2024-25 मध्ये 11 विभागांतील 320 पदांपैकी 264 पदे भरली गेली.

अग्निशमन विभागात 20 जागा मंजूर असूनही 167 पदांची भरती यशस्वीरित्या करण्यात आली आहे.

 

📝 इतर भरती प्रकरणे

 

pmc 7336 posts vacant recruitment update 2025
pmc 7336 posts vacant recruitment update 2025

 

⚠️ कामकाजावर होतोय परिणाम

या भरती प्रक्रियेतील दिरंगाईमुळे नागरिकांना सेवा मिळण्यात विलंब, तसेच महापालिकेच्या अनेक विभागांवर कामाचा अतिरिक्त बोजा निर्माण झाला आहे. विशेषतः आरोग्य, स्वच्छता, बांधकाम, अग्निशमन, कर वसुली यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये ही रिक्तता गंभीर समस्या ठरत आहे. (महापालिका नोकर भरती 2025)

 

 

Local ad 1