सीबीएसई दहावी, बारावी परीक्षेचा निकाल जाहीर
दहावीचा ९३.६६ टक्के, तर बारावीचा निकाल 88.39 टक्के
पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई बोर्ड – Central Board of Secondary Education) दहावी व बारावीचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसई दहावीचा निकाल ९३.६६ टक्के तर बारावी परीक्षेचा निकाल 88.39 टक्के इतका लागला आहे. राज्यात बारावीतील उत्तीर्णांचे प्रमाण हे ९०.६८ टक्के, तर दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ९६.६१ टक्के एवढे आहे. गेल्या वर्षी दहावीत उत्तीर्ण झालेल्यांचे प्रमाण ९३.६० टक्के, तर बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे ८७.९८ टक्के होते. त्यामुळे दहावीच्या निकालात उत्तीर्णांच्या प्रमाणात ०.०६ टक्के, तर बारावीच्या निकालात उत्तीर्णांच्या प्रमाणात ०.४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे, याबाबत सीबीएसई’ने प्रसिद्धिपत्रकाद्वारे निकालाची माहिती दिली. (central board of secondary education result 2025)
सीबीएसई बोर्डाच्यात दहावी परीक्षेसाठी २३ लाख ८५ हजार ७९ विद्यार्थी बसले होते. त्यादपैकी २२ लाख २१ हजार ६३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्रिवेंद्रम विभागात सर्वाधिक ९९.७९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्याी निकालात ९५ टक्केज मुली, तर मुलांचे उत्तीर्णचे प्रमाण ९२.६३ इतके आहे. यावर्षी निकाल गेल्या वर्षीपेक्षा 0.66 टक्के जास्ता लागला आहे. महाराष्ट्रात यंदा सीबीएसई दहावीचा निकाल हा तब्बल 96.6१ टक्के एवढा लागला आहे. या निकालात 97.34 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 96.06 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रातून एकूण 1 लाख 17 हजार 237 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. ज्यापैकी 1 लाख 13 हजार 257 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती सीबीएसई बोर्डाकडून देण्यात आली. (central board of secondary education result 2025)
Related Posts
दरम्यान, सीबीएसई बारावीसाठी देशभरातील 7 हजार 330 परीक्षा केंद्रांवर बारावीची परीक्षा झाली. यावषीच्याझ बारावी परीक्षेसाठी 17 लाख 4 हजार 367 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 16 लाख 92 हजार 794 विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षा दिली. यापैकी 14 लाख 96 हजार 307 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विभागाचा निकाल ९०.९३ टक्केा लागला आहे. महाराष्ट्रात यंदा राज्या तून ३४ हजार ७०३ विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षा दिली. त्या९पैकी ३१ हजार ४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्याहची उत्तीर्णतेची टक्के्वारी ९०.६८ इतकी आहे. यात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.७५ टक्केर, तर मुलाचे प्रमाण ८८.८९ इतके आहे, अशी माहिती सीबीएसई बोर्डाकडून देण्यात आली.
बारावीचा विभागनिहाय निकालात देशात विजयवाडा विभागाचा सर्वाधिक निकाल लागला असून, त्यासची उत्तीर्णतेची टक्केहवारी ९९.६० इतकी आहे. त्या खालोखाल त्रिवेंद्रम विभागातील उत्तीर्णांचे प्रमाण हे ९९.३२ टक्के, चेन्नई विभागाचा ९७.३९ टक्के निकाल लागला. प्रयागराज विभागात सर्वांत कमी ७९.५३ टक्के उत्तीर्णांचे प्रमाण आहे. दहावीच्या विभागनिहाय निकालात विजयवाडा आणि त्रिवेंद्रम विभागांत उत्तीर्णांचे प्रमाण हे प्रत्येकी ९९.७९ टक्के आहे. त्या खालोखाल बेंगळुरू विभागात उत्तीर्णांचे प्रमाण ९८.९० टक्के, चेन्नई विभागात ९८.७१ टक्के, तर गुवाहाटी विभागातील उत्तीर्णांचे प्रमाण हे सर्वांत कमी ८४.१४ टक्के लागला.