...

Vencer Hospital मध्ये देशातील पहिली यशस्वी जटिल शस्त्रक्रिया !

terrible triad elbow injury successful surgery pune vencer hospital

 

पुणे : दुचाकीवरून झालेल्या साध्या घसरगुंडीचा अपघात एका रुग्णासाठी अतिशय गुंतागुंतीच्या ऑर्थोपेडिक आपत्कालीन परिस्थितीत बदलला. रामेश (नाव बदलले आहे) हे रुग्णाला 27 नोव्हेंबर 2025 रोजी Vencer Hospital येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. डाव्या कोपराला तीव्र वेदना, सूज, हालचालींवर मर्यादा आणि वारंवार सांधा निसटण्याची (dislocation) लक्षणे दिसून आली. ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉ. भूषण शितोळे यांनी तपासणी केल्यानंतर करण्यात आलेल्या X-ray, CT स्कॅन आणि MRI तपासणीत कोपराच्या अतिशय दुर्मिळ आणि धोकादायक अशा ‘Terrible Triad Elbow Injury’ चे निदान झाले.

 

 

‘गुन्हेगाराची पत्नी असली तर दोष काय?’ अजित पवारांचा थेट सवाल, टीकेला जोरदार प्रत्युत्तर

 

 

तपासणीत खालील गंभीर जखमा स्पष्ट झाल्या त्यामध्ये Radial head चा तुकड्यांत तुटलेला (comminuted) आणि displaced फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले. तचेस Elbow dislocation, डाव्या ulna च्या coronoid process चा Type III displaced फ्रॅक्चर, Lateral Collateral Ligament (LCL) injury Hemarthrosis (कोपराच्या सांध्यात रक्तस्राव) या सर्व जखमा एकत्र आल्याने कोपराचा सांधा पूर्णपणे अस्थिर (mechanically unstable) झाला होता. “या प्रकारात केवळ हाड मोडलेले नसते, तर संपूर्ण सांध्याची स्थिरता नष्ट झालेली असते. हाडे आणि लिगामेंट दोन्ही योग्य पद्धतीने दुरुस्त करणे अत्यावश्यक असते,” असे डॉ. भूषण शितोळे यांनी सांगितले.

 

पुण्याच्या कारभारावर अजित पवार संतापले; म्हणाले, ‘हे त्रिकूट हटवा, विकास हवा तर सत्ता बदला !

 

स्थिरता पुनर्स्थापनेसाठी जटिल शस्त्रक्रिया

रुग्णाची स्थिती लक्षात घेऊन 29 नोव्हेंबर 2025 रोजी Vencer Hospital येथे एकाच वेळी बहुपदरी शस्त्रक्रिया करण्यात आली. Ulna च्या coronoid process चे ORIF (Herbert screw आणि pull-through sutures चा वापर), odular radial head replacement, (uncemented prosthesis), Lateral collateral ligament repair, Vencer Hospital च्या माहितीनुसार, त्यांच्या केंद्रात भारतामधील अशा प्रकारची ही पहिली शस्त्रक्रिया ठरली.

 

‘Instability failure’ टाळणे हे खरे आव्हान

 

या प्रकारच्या दुखापतीत एखादा घटक नीट दुरुस्त न झाल्यास संपूर्ण सांधा पुन्हा निसटण्याचा धोका असतो. त्यामुळे: सांधा पुरेसा स्थिर करणे, पण त्याच वेळी लवकर हालचाल सुरू करणे, हे दोन्ही संतुलित ठेवणे महत्त्वाचे असते. “जास्त उशीर केला तर stiffness येते, आणि लवकर हालचाल केल्यास dislocation चा धोका असतो. हीच खरी कसरत आहे,” असे डॉ. शितोळे यांनी स्पष्ट केले.

 

यशस्वी पुनर्वसन आणि सामान्य जीवनाकडे वाटचाल

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर राहिली आणि 01 डिसेंबर 2025 रोजी डिस्चार्ज देण्यात आला. पुढील तपासणीत टाके काढून फिजिओथेरपी सुरू करण्यात आली. आज रुग्णाला डाव्या कोपराची पूर्ण हालचाल करता येते. वेदनामुक्त आणि दैनंदिन कामे सुरळीत करण्याची क्षमता मिळाली आहे.

 

 

 

 

 

 

❓ प्रश्न–उत्तर (FAQ)

Q1. Terrible Triad Elbow Injury म्हणजे काय?
👉 कोपराचा dislocation, radial head fracture आणि coronoid process fracture या तिन्ही जखमा एकत्र आल्यास त्याला Terrible Triad Injury म्हणतात.

Q2. ही दुखापत धोकादायक का मानली जाते?
👉 कारण यात कोपराचा सांधा पूर्णपणे अस्थिर होतो आणि योग्य उपचार न केल्यास कायमस्वरूपी अपंगत्व येऊ शकते.

Q3. अशा जखमांवर शस्त्रक्रिया आवश्यक असते का?
👉 होय. बहुतांश प्रकरणांत हाडे, लिगामेंट आणि सांध्याची स्थिरता पुनर्स्थापित करण्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक असते.

Q4. रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो का?
👉 योग्य वेळेत निदान, अचूक शस्त्रक्रिया आणि नियमित फिजिओथेरपीमुळे रुग्ण पूर्ण, वेदनामुक्त हालचाल मिळवू शकतो.

Q5. फिजिओथेरपी का महत्त्वाची आहे?
👉 stiffness टाळण्यासाठी आणि सांध्याची ताकद व लवचिकता परत मिळवण्यासाठी फिजिओथेरपी अत्यावश्यक असते.

 

 

Pune : Rare Terrible Triad Elbow Injury Repaired Successfully at Vencer Hospital

Local ad 1