...

पुणे मेट्रो प्रवाशांसाठी मोठी खुशखबरी ! मंडई स्थानकाचे नव्या प्रवेशद्वार क्रमांक ३ खुला 

पुणे मेट्रो अपडेट । रामवाडी व कासारवाडी मेट्रोवर एस्केलेटर सुविधा सुरू

पुणे. पुणे मेट्रोने प्रवाशांसाठी नवीन सुविधा सुरू करून प्रवास अधिक सोयीस्कर केला आहे. ९ जून २०२५ पासून मंडई मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार क्रमांक ३ खुले करण्यात आले असून, हे प्रवेशद्वार महात्मा फुले मंडईतील टिळक पुतळ्याजवळ आहे. हा प्रवेश द्वार खुला झाल्यामुळे आता बाबुगेनू गणपती, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, दत्त मंदिर, तुळशीबाग, तुळशीबाग राम मंदिर आणि शनिपार या धार्मिक व पर्यटन स्थळांपर्यंत सहज पोहोचता येणे शक्य होणार आहे.

 

 

 

 

 

महिला साक्षरतेतील चिंताजनक दरी: PLFS अहवाल देशातील वास्तव समोर

 

एस्केलेटरमुळे प्रवाशांना सुविधा आणखी वाढेल

 

 रामवाडी आणि कासारवाडी मेट्रो स्थानकांवर सरकत्या जिन्यांची (एस्केलेटर) सुविधा देखील ९ जूनपासून सुरु करण्यात आली आहे. यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि जास्त सामान असलेल्या प्रवाशांसाठी प्रवास अधिक आरामदायक आणि सुरळीत होणार आहे. यापूर्वी या स्थानकांवर जिने आणि लिफ्ट सुविधा उपलब्ध होत्या, पण आता एस्केलेटरमुळे प्रवाशांना सुविधा आणखी वाढेल.

 

 

Pune Metro Mandai Entry Escalator Ramwadi Kasarwadi
Pune Metro Mandai Entry Escalator Ramwadi Kasarwadi

पुणे मेट्रो प्रवाशांना उत्तम आणि आधुनिक सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असून, या नव्या सुविधा मुळे प्रवाशांच्या संख्येत निश्चितच वाढ होईल. (Pune Metro Mandai Entry Escalator Ramwadi Kasarwadi)

Local ad 1