...

PMC Mayor Election 2026 | पुण्याला ६ फेब्रुवारीला मिळणार नवा महापौर; सकाळी ११ वाजता पहिली विशेष सभा

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरची पहिली आणि अत्यंत महत्त्वाची विशेष सभा शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून, याच सभेत नवीन महापौर व उपमहापौरांची निवड केली जाणार आहे. ही सभा सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात येणार आहे. (pune mahapaur nivadnuk 6 february 2026)

 

महापौर व उपमहापौर निवडीसाठीची तारीख, वेळ तसेच सभेच्या अध्यक्षस्थानी पिठासीन अधिकारी यांची निश्चिती करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने विभागीय आयुक्त यांच्याकडे पत्र पाठविले होते. त्यानंतर झालेल्या चर्चेनुसार ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.
पुणे महानगरपालिकेचे प्रशासक तथा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबतची माहिती दिली आहे.निवडणुकीनंतरची ही पहिली विशेष सभा असल्याने या सभेकडे राजकीय व प्रशासकीय पातळीवर विशेष लक्ष लागले आहे. महापौर व उपमहापौर निवडीचा सविस्तर  कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या निवडणुकीमुळे पुणे शहराला तब्बल काही वर्षांनंतर पुन्हा एकदा लोकनियुक्त महापौर मिळणार असून, शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
Local ad 1