पुणे : समाजातील वंचित व दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी क्षितिज व्हिजन फाउंडेशन या चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत कायदेशीर मार्गदर्शन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वंचित घटकांचे हक्क संरक्षण, सामाजिक आधार आणि सक्षमीकरण हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, महिला तसेच अन्यायग्रस्त नागरिक यांना विविध कायदेशीर विषयांवर मार्गदर्शन दिले जाणार आहे.
रात्री अंधारात एकटी उभी असलेली मुलगी; खडकवासला धरणातील सुरक्षा रक्षकाने दाखवली माणुसकी
जमीन वाद, मालमत्ता व कुळ कायदा, महसुली व दिवाणी न्यायालयांमधील प्रकरणे, आदिवासी जमीन संरक्षणाशी संबंधित बाबी तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत येणाऱ्या प्रकरणांवर तज्ज्ञांकडून सल्ला दिला जाणार आहे. याशिवाय वंचित घटकांची आर्थिक फसवणूक, DRT, NCLT तसेच विविध प्राधिकरणांसमोरील प्रकरणांमध्येही कायदेशीर मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या उपक्रमासाठी माजी सनदी अधिकारी व महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाचे माजी अध्यक्ष सुबराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती क्षितिज व्हिजन फाउंडेशनच्या ट्रस्टी अस्मिता पाटील यांनी दिली.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी १, माहेर, मोदिबाग, शिवाजीनगर, पुणे – १६ येथे संपर्क साधावा किंवा ०२०-४५१७१३७१ / ७३६००-१७००१ या क्रमांकांवर संपर्क करावा, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.

