Pune Mayor Election पुणे : पुणे महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाले असून, यंदा पुण्याच्या महापौर पदावर सामान्य महिला आरक्षित असल्याने शहराला दहावी महिला महापौर मिळणार आहे. यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पुणे महापालिकेच्या इतिहासात यापूर्वी ९ महिलांनी महापौर पदाची जबाबदारी सांभाळली आहे. १९९२ साली कमल व्यवहारे यांनी पुण्याच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा मान मिळवला होता. त्या काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडून आल्या होत्या. त्यानंतर वंदना चव्हाण, वत्सला आंदेकर, दीप्ती चौधरी, रजनी त्रिभुवन, राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, चंचला कोंद्रे आणि मुक्ता टिळक यांनी महापौर पद भूषवले आहे. (pune 10vi mahila mahapaur bjp sharyat)
रिअल इस्टेटमध्ये मोठी झेप ! पुणेकरांनी केली ‘इतक्या’ हजार कोटींची घरखरेदी। Pune Housing Report 2025
आता १०व्या महिला महापौरांच्या निवडीची प्रक्रिया सुरू होत असताना, आगामी महापौर अनुभवी असणार की नव्या, तरुण चेहऱ्याला संधी मिळणार, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आरक्षण जाहीर होताच अनेक महिला नगरसेविकांची नावे समोर येत आहेत.
भाजप पक्षातील सूत्रांच्या माहितीनुसार, वर्षा तापकीर, मंजुषा नागपुरे, रंजना टिलेकर आणि मानसी देशपांडे ही नावे महापौर पदासाठी प्रमुख दावेदार म्हणून चर्चेत आहेत. याशिवाय, दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट यांचे नावही जोरदारपणे पुढे येत आहे. बापट कुटुंबाची राजकीय वारसा परंपरा आणि पक्षाची तरुण नेतृत्वाला संधी देण्याची भूमिका पाहता, स्वरदा बापट यांना मजबूत उमेदवार मानले जात आहे.
दरम्यान, पुण्याचा पुढील ‘प्रथम नागरिक’ कोण होणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, महापौर निवडीतून भाजपची आगामी राजकीय दिशा स्पष्ट होणार असल्याचे बोलले जात आहे.
❓ प्रश्न – उत्तर
प्रश्न 1 : यंदा पुणे महापौर पद कोणासाठी आरक्षित आहे?
उत्तर : यंदा पुणे महापौर पद *सामान्य महिला* वर्गासाठी आरक्षित आहे.
प्रश्न 2 : पुण्याच्या इतिहासात यापूर्वी किती महिला महापौर झाल्या आहेत?
उत्तर : आतापर्यंत पुणे महापालिकेत ९ महिला महापौर झाल्या आहेत.
प्रश्न 3 : पुण्याची पहिली महिला महापौर कोण होती?
उत्तर : १९९२ साली कमलताई व्यवहारे पुण्याच्या पहिल्या महिला महापौर झाल्या होत्या.
प्रश्न 4 : भाजपकडून कोणकोणती नावे महापौर पदासाठी चर्चेत आहेत?
उत्तर : वर्षा तापकीर, मंजुषा नागपुरे, रंजना टिलेकर, मानसी देशपांडे आणि स्वरदा बापट ही नावे चर्चेत आहेत.

