पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय ; माॅडेलसह सहा पीडित महिलांची सुटका

Pune Crime News : पुणे शहरात  स्पा (spa center) सेंटच्या नावाखाली वेश्याव्यवसाय केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. पुण्यातील (Pune) औंध परिसरात पुणे पोलीस आणि सामाजिक सुरक्षा विभागाची मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका माॅडेलसह (Model) एकूण सहा पीडित महिलांची सुटका देखील करण्यात आली आहे. (Prostitution under the name of Spa Center in Pune)

 

 

पुण्यातील औंध परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून ‘द व्हाईट व्हीलो स्पा सेंटर सुरु होता.  पोलिसांना या ठिकाणी सुरु असलेल्या अवैध वेश्याव्यवसायाची माहिती मिळाली होती. या स्पा सेंटरवर छापा टाकला. याच सेंटरमध्ये सहा पीडित महिला सापडल्या. सहा पैकी एक महिला मॉडेल असून, या सर्व महिलांची सूटका करण्यात आली आहे. या प्रकरणात सात आरोपी असल्याची माहिती असून त्यातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Prostitution under the name of Spa Center in Pune)

Local ad 1