नांदेड जिल्ह्यात 421 व्यक्ती कोरोना बाधित, 62 बाधित झाले बरे
नांदेड : जिल्ह्यात शनिवारी प्राप्त झालेल्या 1 हजार 818 अहवालापैकी 421 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नांदेड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. आरटीपीसीआर तपासणीद्वारे 364 तर अँटिजेन तपासणीद्वारे 57 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 93 हजार 163 एवढी झाली असून यातील 88 हजार 288 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. (In Nanded district, 421 persons were infected with corona and 62 were infected)
जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 220 असून, 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. (In Nanded district, 421 persons were infected with corona and 62 were infected)
Related Posts
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. शनिवारच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 290, नांदेड ग्रामीण 17, भोकर 3, देगलूर 5, धर्माबाद 3, हिमायतनगर 1, कंधार 6, किनवट 1, लोहा 7, माहूर 1, मुदखेड 3, मुखेड 3, नायगाव 3, वाशीम 1, परभणी 6, हिंगोली 2, अकोला 1, अमरावती 1, जालना 2, पुणे 1, यवतमाळ 1, गडचिरोली 1, मुंबई 1, हैद्राबाद 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 17, नांदेड ग्रामीण 1, अर्धापूर 2, भोकर 1, बिलोली 11, देगलूर 1, धर्माबाद 1, हदगाव 1, किनवट 3, माहूर 1, मुदखेड 4, मुखेड 11, नायगाव 3 असे एकूण 421 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 53, खाजगी रुग्णालय 3, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 3 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. (In Nanded district, 421 persons were infected with corona and 62 were infected)