Monsoon started : राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून, पावसाळ्यात (Monsoon started) कीटकजन्य आजारांपासून विषाणूजन्य आजारांचे ही प्रमाण वाढते. संभाव्य धाेका विचारात घेऊन नागरिकांनी पावसाळ्यात स्वत:ला निराेगी ठेवणे गरजेचे आहे. काही खबरदारी बाळगल्यास ते शक्य आहे, असे तज्ज्ञ डाॅक्टर सांगतात. (Rains have started, now boil the water and drink it)
पावसाळ्यात धरणसाखळीत नवीन पाणी येते. ते पाणी गढूळ असल्यामुळे दूषित पाण्यापासून हाेणारे आजार वाढतात. सर्वप्रथम धोका वाढतो त्यात कावीळ, गॅस्ट्रो, जुलाब (Jaundice, gastro, diarrhea) या जलजन्य आजारांचा. त्याचबराेबर पाणी साठल्यामुळे डासांची उत्पत्ती हाेते आणि मग डेंग्यू, चिकुनगुन्या सह इतर कीटकजन्य आजारही वाढतात. त्यापासून बचाव करण्यासाठी आपल्या घरी आणि घरासभाेवती पाणी साचू न देणे आवशक आहे. तसेच, दुषित पाणी पिले जाण्याची शक्यता असल्याने पिण्याचे पाणी गाळून पिणे तसेच उकळून थंड करून पिणे गरजेचे आहे.
जानेवारीपासून आजारांचे प्रमाण कमी हाेत जाते. उन्हाळयात तर आजारी पडण्याचे प्रमाण निम्म्याने घटते. परंतू जसा पाउस सूरू झाला तसे आजारी पडण्यास सूरवात हाेते. खासकरून लहान मुले आणि घरातील वयाेवृध्दांना याचा सामना करावा लागताे. कारण त्यांची प्रतिकारशक्ती तरूणांच्या तुलनेत कमी असते.
पावसाळयात आपल्या घरात व मालकीच्या जागेत डेंग्यू डासांची किंवा डासांच्या अळयांची उत्पत्ती झाल्यास त्याचा दंड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आकारला जातो. हा दंड अगदी पाचशे रूपायांपासून १० हजार असा तक्रारीच्या गंभीरतेनुसार आकारला जातो. साेसायटया, सरकारी कार्यालये, हाॅस्पिटल्स, खासगी कार्यालये या ठिकाणी हे डास न हाेउन देण्याची जबाबदारी त्या – त्या ठिकाणच्या जबाबदार व्यक्तींवर असते. महापालिकेच्या आराेग्य विभागाने यावर्षी अशा प्रकारचा एप्रिलपर्यंत ४५ हजारंाचा दंड केला आहे.
पावसाळा आल्याने रोगराईचा धोका वाढतो. यासाठी प्रत्येकाने योग्य ती काळजी घ्यावी. यामध्ये आपल्या घरात डासाेत्पत्ती हाेउ न देणे हे फार महत्वाचे आहे. त्यासाठी घरात फुलझाडांची कुंडी, फ्रीजमधील साचलेले पाणी नेहमी स्वच्छ करावे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. पाणी उकळून प्यावे. तसेच, आजारी पडल्यास महापालिकेच्या दवाखान्यांत जावे. – डाॅ. सूर्यकांत देवकर, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे मनपा