मसाप शाखा नांदेडची नूतन कार्यकारिणी जाहीर
अध्यक्षपदी बालाजी इबितदार, कार्यवाह म्हणून प्रा. महेश मोरे
नांदेड – मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडची 2025 ते 2030 या कार्यकालासाठीची नूतन कार्यकारिणी नुकतीच बिनविरोध निवडून आली. अध्यक्षपदी बालाजी इबितदार, तर कार्यवाह पदासाठी प्रा. महेश मोरे यांची निवड करण्यात आली. ही निवडणूक स्व. सुधाकरराव डोईफोडे ज्येष्ठ नागरिक सभागृह, नानानानी पार्क, नांदेड येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून डॉ. जगदीश कदम, तर निरीक्षक म्हणून संजीव कुलकर्णी व देवीदास फुलारी यांनी काम पाहिले. (masap nanded new executive 2025)
साहित्य, समाज आणि संस्कृतीसाठी डॉ. सबनीस यांचे योगदान अमूल्य – शरद पवार
कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत साहित्यिक मारुती चितमपल्ली आणि नरेंद्र नाईक यांना आदरांजली अर्पण करून झाली. त्यानंतर देवीदास फुलारी यांनी निवडणूक प्रक्रियेची रूपरेषा मांडली. मावळते अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर यांनी कार्यकाळातील कार्याचा आढावा घेतला.
नूतन कार्यकारिणी (2025-2030)
अध्यक्ष : बालाजी इबितदार
उपाध्यक्ष : दिगंबर कदम, श्रीनिवास मस्के
कार्यवाह : प्रा. महेश मोरे
सहकार्यवाह : राम तरटे
कोषाध्यक्ष : व्यंकटेश चौधरी
सदस्य : योगिनी पांडे सातारकर, ललिता शिंदे-बोकारे, शेख निजाम गवंडगावकर, अनुजा शंतनु डोईफोडे, धाराशिव शिराळे, व्यंकटेश काटकर, संजय जगताप यांची नियुक्ती करण्यात आली.
निवडीनंतर नूतन अध्यक्ष बालाजी इबितदार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, “शाखेची देदीप्यमान परंपरा जपत आम्ही कार्यरत राहू,” असे सांगितले.