SSC Result : आता दहावीच्या निकालाची प्रतिक्षा, कधी लागणार निकाल जाणून घ्या…

Maharashtra SSC Result 2022  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानंतर आता विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार? याविषयी उत्सुकता आहे. (SSC Result: Now waiting for the result of X.)

 

 

महाराष्ट्र बोर्डाने नुकतेच बारावीचा निकाल जाहीर केला आहे. दहावीची मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झाली असून, पुढील आठवड्यापर्यंत निकाल जाहीर होणार असल्याची माहिती मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागेल. दहावीचा निकाल १५ जून रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (SSC Result: Now waiting for the result of X.)

 

महाराष्ट्र बोर्डाचे १६ लाखांहून अधिक विद्यार्थी दहावीची परिक्षा दिलेली आहे. बोर्डाने उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण केली असून, काही दिवसांत निकालही जाहीर केला जाईल. हा निकाल ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा मार्च २०२२ मध्ये झाली. दरम्यान दहवीच्या परीक्षेत बसलेले विद्यार्थी mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे स्कोअरकार्ड पाहू शकतील. (SSC Result: Now waiting for the result of X.)
Local ad 1