...

Video। कुंडमळा पूल दुर्घटनेचा चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई – उपमुख्यमंत्री अजित पवार 

नवीन पूल दर्शक गॅलरीसह बांधण्यात येणार

पुणे. मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला पादचारी पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून ५१ जण जखमी झाले आहेत. या जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मंगळवारी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आणि कुंडमळा येथे घटनास्थळाची पाहणी केली. (kundmala pool durghatna ajit pawar chaukashi karavi)

 

पुणे जिल्ह्यातील धोकादायक पूल काढून टाका

 

या वेळी पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत निवासी उपजिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, जलसंपदा आणि वन विभागाचे अधिकारी यांचा समावेश आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”

 

 

पुढे बोलताना पवार म्हणाले, “हा पूल पूर्णपणे हटवण्यात येणार असून, त्याठिकाणी ७.५ मीटर रुंदीचा नवीन पूल बांधण्यात येणार आहे. यासाठी पीएमआरडीएमार्फत अंदाजे ४ कोटी रुपयांचा निधी खर्च करून ‘व्यू गॅलरी’ही उभारली जाणार आहे. त्यामुळे पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता येईल. हे काम ११ महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.”

 

मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले निलंबित

 

त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार असून, आयुष्य संपलेले धोकादायक पूल हटवण्यात येतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दुर्घटनेनंतर दोन दिवसांनी पालकमंत्री घटनास्थळी पोहोचल्याने माध्यमांनी उशिराबद्दल प्रश्न उपस्थित केले. “आपण माळेगावच्या मीटिंगमध्ये व्यस्त होता का? येथे यायला उशीर का झाला?” या प्रश्नांवर अजित पवार चिडले. त्यांनी म्हणाले, “हा विषय इथे घेऊ नका. त्यामुळेच मी अनेकदा माध्यमांशी बोलत नाही. मी पाहणीसाठी आलो आहे.”

 

त्यांनी स्पष्ट केलं की, “घटना घडल्यानंतर तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करण्यास सांगितले आणि जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकारकडून करण्याचे निर्देश दिले.”


👉 मुख्य मुद्दे 

  • कुंडमळा पूल दुर्घटनेत ४ मृत, ५१ जखमी
  • चौकशीसाठी जिल्हाधिकारी अध्यक्षतेखाली समिती
  • दोषींवर कारवाईचे आश्वासन – अजित पवार
  • ७.५ मीटर रुंदीचा नवीन पूल ११ महिन्यांत उभारणार
  • पीएमआरडीएमार्फत ४ कोटींची ‘व्यू गॅलरी’
  • संपूर्ण पूल स्ट्रक्चरल ऑडिटची घोषणा
  • उशिरा भेटीवरून माध्यमांशी तणावपूर्ण संवाद

 

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कुंडमळा दुर्घटनास्थळी भेट मावळ रुग्णालयात जखमींची भेट घेऊन विचारपूस

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे साकव पूल पडून झालेल्या दुर्घटनेची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन घेतली. या ठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामाला पावसाळ्यानंतर तातडीने सुरुवात करून लवकरात लवकर उभारणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, मावळचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री  पवार यांनी अधिकारी तसेच स्थानिकांकडून घटनेबाबत तसेच बचाव कार्याबाबत माहिती घेतली. तातडीने धाव घेऊन बचावकार्य केलेल्या स्थानिक नागरिकांना त्यांनी शाबासकी दिली. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना पवार म्हणाले, मावळ तालुक्यात मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यामुळे येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बचाव कार्यासाठी अत्याधुनिक वाहन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात येईल.

घटनेची चौकशी करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक अधिकारी, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता आदींसह निवासी उपजिल्हाधिकारी यांची समिती नेमली आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली. अपघातग्रत पुलाचा उर्वरित सर्व भाग पाडण्यात येणार आहे. याशिवाय आयुष्य संपलेले तसेच स्ट्रक्चरल ऑडिटर्स यांनी वापरण्यास धोकादायक असा शेरा दिलेले इतरही सर्व धोकादायक पूल पाडण्यात येतील, असेही  पवार म्हणाले.

 

नवीन पूल दर्शक गॅलरीसह बांधण्यात येणार

या ठिकाणी साडेसात मीटर रुंदीचा पूल बांधण्यात येणार असून त्याच्या दोन्ही बाजूला ८ फुटाचे दोन पदपथ करण्यात येणार आहे. तसेच हे पर्यटन स्थळ असल्याने दोन दर्शक गॅलरी (व्यूविंग गॅलरी) करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पावसानंतर तातडीने पुलाच्या कामाला सुरुवात करावी, असे निर्देश यावेळी संबंधित बांधकाम कंत्राटदाराला दिले.

 

उपमुख्यमंत्र्यांकडून रुग्णालयात जखमींची विचारपूस

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पवना रुग्णालयात जाऊन या दुर्घटनेतील जखमी रुग्णांची भेट घेतली. तसेच जखमींवर आवश्यक ते सर्व उपचार होतील याची काळजी घ्यावी असे डॉक्टरांना निर्देश दिले. या कामात समन्वयाची जबाबदारी प्रांताधिकाऱ्यांवर राहील, असेही ते म्हणाले.


 

Local ad 1