सण-उत्सवात ध्वनी किती दिवस आणि रात्री किती वाजेपर्यंत वापरता येईल वाचा..

नांदेड : ध्वनी प्रदूषण (Noise pollution) (नियमन व नियंत्रण) नियम 2000 च्या नियम 5 (3) नुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक (Loudspeakers) आदीच्या वापराबाबत श्रोतेगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार सन 2022 साठी पुढील सण, उत्सव काळात 15 दिवस ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत करता येईल, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केली आहे. (Read how many days and nights the sound can be used in festivals)

 

 

 अधिसूचनेत म्हटले आहे की, मा. उच्च न्यायालयाने याचिका (High Court Petition) क्र. 173 / 2010 दि. 16 ऑगस्ट 2016 रोजी दिलेला आदेश / निकालपत्रामध्ये दिलेल्या सुचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. यामध्ये शिवजयंती (Shivjayanti), डॉ. आंबेडकर जयंती (Dr. Ambedkar Jayanti), महाराष्ट्र दिन 1 मे, दिवाळी (Diwali) (लक्ष्मीपूजन), ईद-ए-मिलाद (Eid-e-Milad) ख्रिसमस (Christmas), 31 डिसेंबर, माळेगाव यात्रा (Malegaon Yatra) (लोककला महोत्सवासाठी) एक दिवस. तर गणपती उत्सव (Ganpati Utsav) 2 दिवस (पहिला दिवस व अनंत चर्तुदशी), नवरात्री उत्सव (Navratri celebration) 3 दिवस (पहिला दिवस, अष्टमी व नवमी ), उर्वरित 2 दिवस ध्वनी प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड (District Superintendent of Police Nanded) यांच्या शिफारशी नुसार जिल्ह्यातील महत्वाच्या कार्यक्रमासाठी गरजेनुसार जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने दिले जाईल. (Read how many days and nights the sound can be used in festivals)

 

 

या सण उत्सवासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्याबाबतची सूट जिल्ह्यातील शांतता क्षेत्रासाठी लागू नसून त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधीत महानगरपालिका आयुक्त, स्थानिक स्वराज्य संस्था व ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांची राहील. (Read how many days and nights the sound can be used in festivals)

 

 

ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांनी ध्वनी प्रदूषण नियम 2000 अंतर्गत प्राप्त तक्रारीवर मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात विहित पद्धतीने कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सदर सण उत्सव समाप्तीनंतर लगेच नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. ही अधिसूचना आदेश 17 जानेवारी 2022 रोजीपासून नांदेड जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे, असेही अधिसूचनेत नमुद केले आहे. (Read how many days and nights the sound can be used in festivals)

Local ad 1