...

नवीन वर्षाच्या प्रारंभी अनेक रेल्वे गाड्या रद्द : रद्द गाड्याचे तुमचे रिझर्वेशन तर नाही चेक चे करा

पुणे : मध्य रेल्वेने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दौंड–मनमाड रेलमार्गाच्या दुहेरीकरण (डबल लाइन) कामाला सुरुवात केली आहे. या कामामुळे ४ ते २५ जानेवारीदरम्यान अनेक रेल्वे गाड्यांची वाहतूक बंद राहणार असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. विशेषतः पुणे–सोलापूर मार्गावरील लोकल आणि एक्सप्रेस गाड्या तब्बल ११ दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे पुणे, सोलापूर, बारामती, उरूळी, दौंड परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, कर्मचारी आणि व्यावसायिक प्रवाशांचे हाल वाढण्याची शक्यता आहे. (daud manmad double line train cancellations january 2025 pune)

 

 

रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार, पुणे–अमरावती, पुणे–नागपूर, पुणे–नांदेड, अजनी, हरंगुल, नांदेड–पनवेल अशा १५ पेक्षा जास्त गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय ७ गाड्यांचे मार्ग बदलले गेले असून २ गाड्या खडकी स्टेशनवरूनच परत पाठवण्यात येणार आहेत. उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यांकडे जाणाऱ्या १५ लांब पल्ल्याच्या गाड्या ४ ते ५ तास उशिराने धावतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा प्रदेशातील हजारो प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करावी लागेल.

 

रद्द गाड्यांची यादी (तारीखानुसार)

पुणे–अमरावती एक्सप्रेस : २४–२५ जानेवारी
अमरावती–पुणे एक्सप्रेस : २३–२४ जानेवारी
अजनी एक्सप्रेस : २४–२५ जानेवारी
दौंड–निजामाबाद एक्सप्रेस : २३–२४ जानेवारी
पुणे–नागपूर–पुणे गरीब रथ : २३–२४ जानेवारी
पुणे–नांदेड एक्सप्रेस : २४–२५ जानेवारी
पुणे–अजनी हमसफर एक्सप्रेस : २४ जानेवारी
नागपूर एक्सप्रेस : २५ जानेवारी
पनवेल–नांदेड एक्सप्रेस : २४–२५ जानेवारी
पुणे–हरंगुल एक्सप्रेस : २४–२५ जानेवारी
दादर–साईनगर शिर्डी एक्सप्रेस : २१, २२, २४ जानेवारी

 

मार्ग बदललेल्या ७ गाड्या

यादीतील प्रमुख गाड्या :
* यशवंतपुर–चंदीगढ एक्सप्रेस
* सातारा–दादर एक्सप्रेस
* तिरुअनंतपुरम–सीएसएमटी एक्सप्रेस
* जम्मू तवी–पुणे एक्सप्रेस
* गोवा एक्सप्रेस
* पुणे–गोरखपूर एक्सप्रेस
इत्यादी…

खडकी स्टेशनवरूनच परत पाठवल्या जाणाऱ्या गाड्या
* इंदौर–दौंड एक्सप्रेस – २३, २४ जानेवारी
* ग्वालियर–दौंड एक्सप्रेस – २३, २४ जानेवारी

उशिराने धावणाऱ्या १५ गाड्या

विशाखापट्टणम, बेंगळुरू, अमरावती, हटिया, लखनऊ, जबलपूर, भुवनेश्वर, हावडा, मुजफ्फरपूर, काजीपेठ, जम्मू तावी आदी गाड्या १ ते ५ तास उशिराने चालणार.

 

प्रवाशांचे हाल – पर्यायी मार्ग शोधण्याची वेळ
या निर्णयामुळे शाळा–कॉलेज विद्यार्थी, नोकरीसाठी पुणे-बारामती-दौंड मार्गाने ये-जा करणारे कर्मचारी, व्यावसायिक प्रवासी तसेच कृषी माल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होणार आहे.

 

Local ad 1