RTE admission । मोठी बातमी : आरटीई प्रवेशासाठी मिळाली मुदतवाढ

RTE admission । आर्थिक दुर्बल घटकांतील मुलांना शिक्षण घेता यावे, कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE admission) एकूण प्रवेशाच्या 25 टक्के जागा त्यांच्यासाठी आरिक्षत असतात. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज (Online application) मागवले जात आहेत. मात्र, राज्य सरकारी कर्मचारी संपवार (State Government Employees Strike) गेल्याने आवश्यक दाखले मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे 25 मार्चपर्यंत प्रवेशासाठी अर्ज करण्यास मुदवाढ देण्यात आली आहे

 

 

 

आरटीई प्रवेशासाठी पालकांचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला महत्वाचा आहे. त्यावरच प्रवेश निश्चित होत असतो. मात्र, शासकीय कर्मचारी संपावर गेल्याने दाखले देण्याचे काम पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे अनेक पालकांना अर्ज भरता आला नाही. त्यामुळे मुदवाढ द्यावी, अशी मागणी पालकांतून होत होती. (Big news got extension for RTE admission)

 

 

आगामी शैक्षणिक वर्षाकरीता आठ हजार 828 शांळांमध्येएक लाख एक हाजर 696 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. 1 ते 17 मार्च दरम्यान, प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. या दरम्यान, तीन लाख 15 हजार 722 अर्ज प्राप्त झाली आहेत. (Big news got extension for RTE admission)

 

दाखले मिळण्यास होत असलेला विलंब आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेकांना अर्ज भरता आलेला नाही. त्यामुळे मुदतवाढ द्या, अशी मागणी होत होती. त्यानुसार 25 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे, असे प्राथमिक शिक्षण संचालनायातर्फे सांगण्यात आले आहे. (Big news got extension for RTE admission)

Local ad 1