पुणे, दि. १० : बारमती (२०१) विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा उमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आगामी पोटनिवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यापार्श्वभूमीवर अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२६ हा अर्हता दिनांक धरून विशेष संक्षिप्त पुनरीक्षणानंतर ही यादी १० मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. अंतिम यादीप्रमाणे मतदारसंघातील एकूण मतदारसंख्या ३ लाख ८३ हजार ७६७ इतकी झाली आहे. Election Commission of India यांच्या ६ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या निर्देशानुसार बारामती मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमाअंतर्गत ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर ९ ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दावे आणि हरकती स्वीकारण्यात आल्या. (baramati by election final voter list 2026)
Heat stroke symptoms ! उष्माघात टाळण्यासाठी आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या सूचना
प्राप्त अर्जांची छाननी करून आवश्यक त्या दुरुस्त्या केल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
* पुरुष मतदार: १,९३,४९६
* महिला मतदार: १,९०,२७१
* इतर मतदार: २४
* एकूण ३,८३,७६७ मतदारयापूर्वी २० ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत मतदारसंख्या ३,६०,६०८ इतकी होती. तर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीत३,८८,३७१ मतदारांची नोंद करण्यात आली होती.
ही अंतिम मतदार यादी सर्व नागरिक आणि राजकीय पक्षांसाठी पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील तरतुदीनुसार अपील करता येणार आहे. संबंधित अपील १५ दिवसांच्या आत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे यांच्याकडे दाखल करता येईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी दिली.

