...

हायटेक, हरित आणि स्मार्ट – औंध-बोपोडीसाठी सनी निम्हणचा विकास आराखडा

 

पुणे : पुणे शहराचे उत्तर प्रवेशद्वार असलेले औंध हे ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे उपनगर असून आता ते केवळ ‘स्मार्ट सिटी’पुरते मर्यादित न राहता उच्च तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाचे मॉडेल उपनगर म्हणून पुढे नेण्याचा निर्धार भारतीय जनता पक्ष-रिपाई युतीचे उमेदवारचंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांनी व्यक्त केला आहे.

 

 

प्रभाग क्रमांक 8 (औंध-बोपोडी) मधील पदयात्रेच्या समारोपप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, औंध येथे ते बोलत होते. यावेळी सहकारी उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ती गायकवाड, सपना छाजेड, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, माजी नगरसेविका संगीता गायकवाड, स्वीकृत मजी नगरसेवक वसंत जुनवणे, औंध विश्वस्त मंडळ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

सनी निम्हण म्हणाले, “शहराचा विकास फक्त प्रशासकीय यंत्रणेमुळे शक्य होत नाही. त्यात नागरिकांचा सक्रिय सहभाग तितकाच महत्त्वाचा असतो. औंध-बोपोडी परिसराने प्रशासन आणि जनसहभाग यांचे आदर्श उदाहरण देशासमोर ठेवावे.” ते पुढे म्हणाले की, औंध-बोपोडी प्रभागात उच्च तंत्रज्ञानावर आधारित नागरी सेवा, डिजिटल सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता व पर्यावरणपूरक विकासावर भर देण्यात येईल. हा परिसर भविष्यात शाश्वत विकासाचे आदर्श मॉडेल बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. निम्हण यांनी मुळा नदीचे पात्र आणि घाट परिसराचा पर्यावरणपूरक विकास करण्यावर विशेष भर देत, या भागातील नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवण्याची गरज अधोरेखित केली. या उपक्रमांमुळे औंध-बोपोडी परिसरात जीवनमान उंचावणे, हरित क्षेत्र वाढवणे आणि सर्वसमावेशक विकास साधणे हे प्रमुख उद्दिष्ट राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Local ad 1