IAS पूजा खेडकरांच्या आरोपानंतर महसूल विभागातील अधिकारी जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या पाठीशी खंबीर

 

पुणे. वादग्रस्त ठरलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Probationary Officer Pooja Khedkar) ने थेट जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी छळ केल्याचा गंभीर आरोप केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. आता जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आणि कोतवाल यांनी पूजाने महसूल विभागाची बदनामी केली असुन, त्यांच्याविरोधात कारवाई करा, अशी मागणी केली आहे. (Allegations of Pooja Khedkar; Officers of Revenue Department standing with Collector Dr. Suhas Diwase)

 

 

 

पुजा आणि तवडील दिलीप खेडकर हे अनेक बाबींमध्ये दोषी आढळल्या आहेत, असे असताना लक्ष विचलित करण्यासाठी पूजा यांनी थेट पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याविरोधात तक्रार केली आहे. दोघांवर कठोर कारवाई करा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे. पुणे जिल्हा तलाठीआणि महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी यांच्याकडे केली आहे. तसेच
आम्ही सर्वजण जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांच्या पाठीशी असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयात दिलेल्या निवेदनात मागणी करण्यात आली आहे.

 

 

यावेळी महसूल संघटनेचे अध्यक्ष दीपक चव्हाण, विनायक राऊत,
पुणे जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष सुधीर तेलंग, महाराष्ट्र उपाध्यक्ष बजरंग मेकाले, सरचिटणीस सुधीर गिरमे, चांदपशा तांबोळी, वैशाली कोळेकर यांच्यासह तलाठी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

 

प्रशिक्षणार्थी भा.प्र.से. अधिकारी पुजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथील प्रशिक्षण कालावधीमध्ये अत्यंत उद्दामपणाचे वर्तन केलेले असून ते कोणत्याही प्रशिक्षणार्थी अधिका-यास शोभणारे नाही. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यास केबिन, गाडी, निवास, स्वतंत्र शिपाई अशा कोणत्याही सुविधा पुरविणेबाबतची तरतुद नसूनही त्यांनी त्याचा सातत्याने आग्रह धरुन जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचेशी परस्पर संपर्क साधून त्यांना दम देऊन जबरदस्तीने अशा सुविधा प्राप्त करुन घेणेचा प्रयत्न केलेला आहे. तसेच त्यांच्या वडीलांनी देखील तहसिलदार दर्जाच्या अधिकाऱ्यास दम देऊन, अन्य वरिष्ठ प्रशासकीय अधिका-याच्या अॅन्टी चेंबरचा ताबा घेऊन, श्रीमती खेडकर यांचेसाठी स्वतंत्र केबिन तयार करुन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.

 

 

प्रशिक्षणार्थी अधिकारी यांच्या वडीलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांना दमदाटी केललेली असल्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. पुजा खेडकर यांच्या बाबतीत समोर येत असलेल्याबाबी म्हणजेच बोगस दिव्यांग प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राच्या आधारे अन्य पात्र उमेदवारांचा हक्क डावलून भा.प्र.से. अधिकारी पद मिळविले या बाबींचा संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या वडीलांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केलेली दमदाटी व पुजा खेडकर यांनी जिल्ह्याधिकारी पुणे यांच्यावर, महिला असलेचा फायदा घेऊन स्वतःचा छळ केलेबाबतची केलेली खोटी तक्रार याचा संघटनेच्या वतीने निषेध करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

 

अधिकाऱ्यांवर घाणेरडे आरोप करुन एकूणच जिल्हीनने शासनाचा प्रतिमा मलिन करणेची बाब खपवून घेतली जाणार नाही. याबाबतीत आम्ही सर्वजण जिल्हाधिकारी पुणे यांच्या पाठीशी आहोत. डॉ.सुहास दिवसे, जिल्हाधिकारी पुणे हे अत्यंत चांगले अधिकारी असून त्यांना आम्ही २५ ते २६ वर्षांपासून ओळखत आहोत. आजपर्यंत त्यांनी कधीही कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचारी यांचेशी कसल्याही प्रकारचे गैरवर्तन केलेले नाही. तसेच त्यांनी गैरवर्तन केलेबाबत आजपर्यंत कोणत्याही महिला अधिकारी किंवा कर्मचारी यांचेकडून कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही.

 

19 उप जिल्हाधिकारी, तहसीलदार मैदानात

महसूल विभागातील प्रमुख अधिकारीजिल्हाधकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले आहेत. पुजा खेडकर ने महसूल विभागाची बदनामी केली आहे. डॉ दिवसे यांच्यावर लावलेले आरोप चुकीचे असुन, आजपर्यंत एकही तक्रार झालेली नाही, नियमात नसलेल्या सुविधा न पूरविल्यामुळे खोटे आरोप केले आहेत, त्यामुळे पूजा यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यावर 19 उप जिल्हाधिकारी तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी निवेदन दिले आहे.

 

Local ad 1